घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राच्या मातीवर पाऊल ठेवल्यास तंगडेच तोडू; मनसेचा बृजभूषण सिंह यांना इशारा

महाराष्ट्राच्या मातीवर पाऊल ठेवल्यास तंगडेच तोडू; मनसेचा बृजभूषण सिंह यांना इशारा

Subscribe

उत्तर प्रदेशचे भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही, तर त्यांनी अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर अयोध्येसह महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे.

उत्तर प्रदेशचे भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही, तर त्यांनी अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर अयोध्येसह महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. अशातच आता मनसेकडून बृजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर देत इशारा देण्यात आला आहे. मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत हा इशारा दिला आहे. “बृजभूषण सिंह याने महाराष्ट्राच्या मातीवर पाऊल ठेवून दाखवावे दाखवावे, त्याच्या तंगड्या हातात दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

“राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर राम लल्लाचं दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि या दौऱ्याची देशभर चर्चा सुरू झाली. मग अनेकांच्या पायखालची वाळू सरकू लागली. मग राज ठाकरेंना एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला. बृजभूषण सिंह यांचे फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर व्हायरल झाली. त्यांना महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली. त्यानंतर बृजभूष सिंह यांनी अशी भूमिका घेतली. मात्र आम्ही नेहमीच एकटे होतो. आम्हाला त्याने फरक पडत नाही. सुपारीबाज बृजभूषण सिंह याने राज ठाकरे यांना अयोध्येत यायला विरोध केला. एक हिंदू असून एका हिंदूला श्री रामांच्या दर्शनाला येण्यापासून त्याने रोखले. 5 तारखेला अयोध्येत राज ठाकरेंसोबत येणाऱ्या प्रत्येकाला शरयू नदीत बुडवण्याची भाषा त्याने केली. तसेच, ब्रिजभूषण याने मुंबईत येऊन सभा घेण्याचे ट्विट केले आहे. बृजभूषण सिंह याने महाराष्ट्राच्या मातीवर पाऊल ठेवून दाखवावे, त्याच्या तंगड्या हातात दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, त्याला माझे निमंत्रण आहे, त्याने कधीही महाराष्ट्रात येऊन दाखवावे”, असे खुले आवाहन मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी आज सोशल मीडियावर द्वारे केले आहे.

हेही वाचा – “ब्रिज”चे निर्माते म्हणत मनसेकडून पवार आणि बृजभूषण सिंहांचा फोटो ट्विट, राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात रसद पुरवल्याचा आरोप

- Advertisement -

राज ठाकरे आता खेळाचं मैदान सोडून पळतात

बृजभूषण सिंह यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरे आता खेळाचं मैदान सोडून पळत आहेत. ठाकरेंना ट्रॅप केलं जातंय अशा प्रकारचा आरोप देखील त्यांनी आमच्यावर लावला आहे. परंतु कोण षडयंत्र करत होतं आणि त्यांना ट्रॅप करत होतं, ते त्यांनाच माहितीये. मात्र, अयोध्येला 5 जून रोजी 5 लाख लोकांसोबत मी जाणार आहे. 5 जूनला मी सर्व लोकांसोबत महादर्शन करणार असून मी एक कार्यक्रम ठेवला आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे चिरंजीव 50 क्विंटलचा लाडू तयार करणार आहेत. आम्ही हनुमान आणि श्री रामाचं दर्शन करणार आहोत, असं खासदार बृजभूषण सिंह म्हणाले.


हेही वाचा – संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा मविआवर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -