घरताज्या घडामोडीमनसेला खिंडार पडणारा अजून जन्माला आला नाही - जितेंद्र पाटील

मनसेला खिंडार पडणारा अजून जन्माला आला नाही – जितेंद्र पाटील

Subscribe

दोन दिवसांपुर्वीच मनसेचे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले होते. यावेळी रुपेश पाटील यांनी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकुर यांच्यावर जहरी टीका देखील केली होती.

मितेश जाधव

पेण : दोन दिवसांपुर्वीच मनसेचे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले होते. यावेळी रुपेश पाटील यांनी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकुर यांच्यावर जहरी टीका देखील केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मनसेतून दोन पाच गेले तरी काही फरक पडत नसल्याचे सांगत मनसेला खिंडार पडणारा अजून जन्माला आला नाही. स्वतःला तालुका अध्यक्ष समजणारे त्यांच्या सोबत कधी एवढे कार्यकर्ते फिरत नव्हते, मग पक्ष प्रवेशा वेळी एवढी माणसे आणली कुठून की फक्त जेवणासाठी आणली होती असा टोलाही लगावला. एवढेच नव्हे तर पेण पालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असुन सत्ताधाऱ्यांची घराणेशाहीच पालिका चालवत आहे, त्याला पूर्णविराम दिला पाहिजे असे सांगुन येत्या नगरपालिका निवडणुकीत पेण मधून 15 उमेदवार लढणार असल्याचे जाहीर करत भाजपाला देखील जितेंद्र पाटील यांनी टार्गेट केले.

- Advertisement -

“आमचे दैवत राज ठाकरे यांच्यावर टीका सहन करणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेश येतील तेव्हा जशाच तसे उत्तर दिले जाईल. ज्याला पक्षाने शून्यातून ज्याला उभा केला आणि तालुका अध्यख बनवला तो टीका पक्ष सोडल्यावर टीका करायला लागला. आम्ही त्यावेळी एकाच घरात महत्वाची तीन पदे देऊन चूक केली. यापुढे तरी दिल्या घरी सुखी राहा असा गुरू म्हणून सल्ला दिला. येत्या दोन महिन्यात पेण तालुक्यात 500 जणांचा मनसेत प्रवेश करणार आहोत”, असे जितेंद्र पाटील यांनी म्हटले.

मनसेने पेण मध्ये स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. आम्ही लवकरच पेणमध्ये आणखी दहा शाखा उघडणार असून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. पेण मध्ये लवकरच 1 लाख रुपेश बक्षीस असलेले कबड्डीचे सामने आयोजित करणार आणि जेएसडब्ल्यू कंपनीवर लवकरच हजारोंचा मोर्चा काढणार असल्याचे जितेंद्र पाटील यांनी जाहीर केले.

- Advertisement -

यावेळी मनसेच जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष संदीप ठाकुर, जिल्हा महीला अध्यक्षा सपना देशमुख, शहर अध्यक्ष सुदेश संसारे आदींसह मनसेने पदाधिकारी व कार्यकर्ते गांधी मंदिर येथे झालेल्या सभेवेळी उपस्थित होते.


हेही वाचा – हळूहळू सर्व बाहेर येणार, पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांचा पुन्हा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -