घरताज्या घडामोडीमनसे, भाजप एकत्र येणार?

मनसे, भाजप एकत्र येणार?

Subscribe

भाजपचे नेते गणेश नाईक यांनी महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप मनसे एकत्र लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांची महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यात नवी युती पहायला मिळणार आहे. याची सुरुवात कदाचित नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून होणार आहे. नवी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप मनसे सोबत लढणार असल्याचे समजते आहे. भाजपचे नेते गणेश नाईक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नाईक यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा महाविकास आघाडीने चंग बांधला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने गणेश नाईक यांचा पराभव करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांनी आपला गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी ते मनसेसोबत जाणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल” नाईकांचा आव्हाडांना फिल्मी स्टाईल टोला

युती केल्यास मनसेला फायदा?

नवी मुंबईमध्ये मनसेची ताकद मर्यादित आहे. मात्र, भाजपसोबत युती केल्यास नाईकांच्या ताकदीचा मनसेला निश्चित फायदा होऊ शकतो. गणेश नाईकांमुळे मनसेचे काही नगरसेवक निवडून येऊ शकतात, अशी चर्चा मनसेच्या वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे भाजपसोबत जाण्याबाबतच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -