घरताज्या घडामोडीपुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, मनसेचा चित्रपट निर्मात्यांना इशारा

पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, मनसेचा चित्रपट निर्मात्यांना इशारा

Subscribe

भारतातील इंडस्ट्रीमध्ये पाकिस्तानातील कलाकारांना प्राधान्य देऊ नये, अशी भूमिका मनसेची कायमच राहिली आहे. पुलवामा हल्ला झाल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना विरोध केला आहे. मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणानंतर मनसेने पाकिस्तानी कालाकारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. दरम्यान, मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बॉलिवूडमधील निर्मात्यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले अमेय खोपकर?

- Advertisement -

बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे. असं कानावर येतंय, ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागते. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की, फक्त मुंबईच काय हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतील कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील, असे अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान, भारतात अनेक पाकिस्तानी कलाकरांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये फवाद खान, माहिरा खान, इम्रान अब्बास, जावेद शेख, नसिरुद्धीन शाह या कलाकारांचा समावेश आहे.


हेही वाचा : बेकायदा बांधकामप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा, आमदार राजू पाटलांची मागणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -