घरताज्या घडामोडीशिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय, अमेय खोपकरांनी धर्मवीरमधील 'तो' सीन केला ट्विट

शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय, अमेय खोपकरांनी धर्मवीरमधील ‘तो’ सीन केला ट्विट

Subscribe

प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आता झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, चित्रपटगृहात दाखवलेल्या चित्रपटातील एक वाक्य झी ५ मधील चित्रपटातून वगळण्यात आल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

लोकनेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट धर्मवीर हा चित्रपट नुकताच येऊन गेला. महाराष्ट्रभर अनेक शिवसैनिकांनी हा चित्रपट पाहिला. हा ब्लॉकबस्टर चित्रपट अनेक आठवडे चित्रपटगृहात हाऊसफुल्ल होता. दरम्यान, प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आता झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, चित्रपटगृहात दाखवलेल्या चित्रपटातील एक वाक्य झी ५ मधील चित्रपटातून वगळण्यात आल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे. (MNS leader Ameya Khopkar tweet about cut part of Dharmveer movie targeting CM Uddhav Thackeray)

हेही वाचा – …तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचं संपादक बनवलं, संदीप देशपांडेंचा राऊतांवर हल्लाबोल

- Advertisement -

महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. ‘खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा. ‘धर्मवीर’जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय.’ असं म्हणत अमेय खोपकर यांनी हे दोन्ही व्हिडिओ पोस्ट केले आहेत.


चित्रपटगृहात दाखवण्यात आलेल्या चित्रपटात काय संवाद आहेत

- Advertisement -

राज ठाकरे – धर्मवीर, अहो हिंदुत्वाचं काम अजून सर्वदूर पोहोचलं नाहीय. असं पडून राहून कसं चालेल
आनंद दिघे – ती जबाबदारी आता तुमच्यावर आहे. आम्ही आता म्हातारे थकलो…
राज ठाकरे – असं… तसं असेल तर असं ठणठणीत म्हातारपण सगळ्यांच्याच नशिबी येवो.

झी ५ अॅपवरील संवाद

राज ठाकरे – धर्मवीर, अहो हिंदुत्वाचं काम अजून सर्वदूर पोहोचलं नाहीय. असं पडून राहून कसं चालेल
आनंद दिघे – आम्ही म्हातारे थकलो…
राज ठाकरे – असं… तसं असेल तर असं ठणठणीत म्हातारपण सगळ्यांच्याच नशिबी येवो.

म्हणजेच, हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे, असं आनंद दिघे यांचं वाक्य कापण्यात आलं आहे. त्यामुळे अमेय खोपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -