घरताज्या घडामोडीkrishna janmashtami 2021:...तर दादरमध्ये दहीहंडी साजरी करू; मनसे आक्रमक

krishna janmashtami 2021:…तर दादरमध्ये दहीहंडी साजरी करू; मनसे आक्रमक

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दहीहंडी उत्सव (krishna janmashtami 2021) साजरा न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा दहीहंडी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मात्र मनसेने मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाण्यातील भगवती मैदानात मनसे जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यादरम्यान अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर ठाण्यात नाहीतर दादरमध्ये दहीहंडी साजरी करून, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, ‘जर ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये साजरी करू.’ तसेच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील ट्वीट करून म्हटले आहे की, ‘आदेश राजसाहेबांचा..हिंदू सण साजरे होणारच…यंदाची दहीहंडी दणक्यात. उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा. चलो ठाणे दहीहंडी.’

- Advertisement -

दरम्यान ठाण्यात आज सकाळापासून दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसेचे आंदोलन सुरू आहे. ठाण्यातील भगवती मैदानात मनसेच्यावतीने एक भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. यंदा दहीहंडी होणारच यावरती मनसे ठाम असून त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यामुळे मनसेच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पण मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपोषणाला बसल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उद्या ठाण्यात ज्या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार होता, त्याठिकाणी पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. स्टेज हटवण्याचे काम केले जात असून मैदानाबाहेर कार्यकर्त्यांना केले आहे.

- Advertisement -

 

दहीहंडी होणारच…

Posted by Avinash Jadhav MNS on Sunday, August 29, 2021

 


हेही वाचा – ‘उघड दार उद्धवा’ म्हणत मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -