राज ठाकरेंचा ‘या’ नेत्याने शब्द पाळला, थेट अयोध्येत धडक

'आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आम्ही ठरवल्यावर कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच', असे मनसेचे ठाणे-पालघप जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (MNS leader Avinash Jadhav) यांनी अयोध्येत दाखल (Ayodhya) झाल्यावर म्हटले.

raj thackeray

‘आम्ही बरेच महाराष्ट्र सैनिक अयोध्येत आलो आहोत. रामलल्लांचे दर्शन प्रत्येक हिंदूने घेतले पाहिजे’, असे मनसेचे ठाणे-पालघप जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (MNS leader Avinash Jadhav) यांनी अयोध्येत दाखल (Ayodhya) झाल्यावर म्हटले. रविवारी सकाळी फेसबूकच्या माध्यमातून अविनाश जाधव यांनी आपण अयोध्येत असल्याचे सांगितले. अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले असून त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले.

अयोध्येत जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतल्यानंतर अविनाश जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. फेसबूकच्या माध्यमातून त्यांनी हा निशाणा साधला. ते म्हणाले की, “आम्ही बरेच महाराष्ट्र सैनिक अयोध्येत आलो आहोत. रामलल्लांचे दर्शन प्रत्येक हिंदूने घेतले पाहिजे. मी सर्व मराठी माणसांना विनंती करेन की येथे आले पाहिजे. आज पाच तारीख असून एक मराठी माणूस अयोध्येत आला आहे आणि रामलल्लांचे दर्शन घेतले आहे”, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.

हेही वाचा – राज ठाकरेंनी दिलेले पत्र वाटणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

५ जून रोजी दौरा करणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. ५ जून रोजी दौरा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. राज ठाकरेंच्या या घोषणेनंतप संपूर्ण राज्यासह देशभरातील राजकीय वातावरण तापलं.

हेही वाचा – बृजभूषण सिंहांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात, मुंबईतील उत्तर भारतीयांचा राज ठाकरेंना पाठिंबा

उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागण्याचे आव्हान

उत्तर प्रदेशचे भाजापाचे खासदार बृजभुषण सिंग यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागण्याचे आव्हान केले होते. तसेच, ५ जून रोजी मोर्चा काढणार असल्याचेही म्हटले होते. परंतु, कालांतराने राज ठाकरे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने अयोध्या दौरा स्थगित केला. मात्र मनसे नेते अविनाश जाधव हे आपल्या कार्यकर्त्यांसह आज अयोध्येत दाखल झाले.


हेही वाचा – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सिंहगड किल्ला घाट रस्त्यावर संरक्षक जाळ्या; मान्सूनपूर्व कामांना वेग