घरताज्या घडामोडीयाला म्हणतात दानत, मनसे माजी आमदाराने मासिक मानधन दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीत

याला म्हणतात दानत, मनसे माजी आमदाराने मासिक मानधन दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीत

Subscribe

राज्यातील सर्व आजी माजी आमदार व खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधींनी आपले स्वतःचे मासिक मानधन/ वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सर्व राजकीय नेते आपल्याला जमेल तेवढी मदत करत आहे. राज्यातील कुठलाही नेता लक्षात राहतो तो त्याने केलेल्या कामामुळे, कर्तृत्वाने, बलिदानाने आणि निर्णयाने परंतु कामाने नेहमी लक्षात राहतो तोच खरा नेता आणि तोच समाजाचा खरा समाजसेवक असतो. महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यापासून कोविडच्या महामारीने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजविला असून गेल्या दीड ते दोन महिन्यात लोकांना आणि शासनालाही आर्थिक गोष्टींचा प्रचंड सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि माजी आमदार व माजी गृह राज्यमंत्री तसेच समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणून मनसे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी एप्रिल महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी घेण्यात यावे अशी मागणी केली आहे.

कोरोना काळात राज्य सरकारला आर्थिक सहाय्य या पार्श्वभूमीवर एक जबाबदार लोकप्रतिनिधी माजी आमदार व माजी गृह राज्यमंत्री तसेच समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणून मला मिळणारे माहे एप्रिल २०२१ चे मासिक मानधन कोविड रुग्णाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी घेण्यात यावे अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. तसेच राज्यातील सर्व आजी माजी आमदार व खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधींनी आपले स्वतःचे मासिक मानधन/ वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे, तसेच महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी देखील या कठीण काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करावी असे आवाहन सुद्धा मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी पत्राद्वारे सर्वांना केले आहे.

- Advertisement -

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या संपुर्ण महाराष्ट्रासह मुंबई शहरात कोविड -१९ च्या दुस-या लाटेने थैमाण घातले आहे व त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या प्रमाण वाढत असुन त्याकरीता आवश्यक असणा-या वैद्यकीय सुविधा जसे रेमडिसिवर इंजेक्शन, टोसिलीझूमॅब इंजेक्शन, ऑक्सिजन अपु-या पडत आहेत. तसेच दिनांक ०१ मे २०२९ पासुन १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्र शासनावरील खर्चाचा बोजा वाढला असुन सध्याच्या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे शासनाच्या उत्पनात घट झाली आहे.

या पार्श्वभुमीवर एक जबाबदार लोकप्रतिनिधी माजी आमदार व माजी गृहराज्यमंत्री तसेच समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणून मला मिळणारे माहे एप्रील – २०२९ चे मानधन (वेतन) कोविड – १९ च्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात यावे व तसे आदेश संबघितांना द्यावेत हि विनंती करतो. माझी अशीही विनंती आहे की, राज्यातील सर्व आजी- माजी आमदार व खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधीनी आपले मानधन (वेतन) जे आपणास मिळते ते. सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे. याकरीता शासन स्तरावरुन आवाहन व विनंती करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी देखील या कठीण काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सहकार्य करणे काळाची गरज असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -