“माय मराठी”ला नख लावाल तर अंगावर जाऊ…; मराठी गाण्यावरून मनसे आक्रमक

हॉटेलमध्ये मराठी गाणी न लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हॅाटेल व्यवस्थापकाला बेदम चोप दिला आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर नवीमुंबई पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे.

हॉटेलमध्ये मराठी गाणी न लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हॅाटेल व्यवस्थापकाला बेदम चोप दिला आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर नवीमुंबई पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. “असे किती ही गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण ‘माय मराठी’ला नख लावाल तर अंगावर जाऊ”, असा इशारा मनसे नेते गजानन काळे यांनी दिला आहे. (MNS leader Gajanan Kale Angry Navi Mumbai Police)

मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून इशारा दिला आहे. “मराठी गाणी लावा हा अट्टाहास केला म्हणून नवी मुंबई महाराष्ट्रसैनिकांवर गुन्हा दाखल. असे किती ही गुन्हे दाखल झालेत तरी चालतील पण “माय मराठी”ला नख लावाल तर अंगावर जाऊच…पहिले हात जोडून आणि नाही ऐकले तर हात सोडून…मनसे स्टाईल”, अशा शब्दांत गजानन काळे यांनी इशारा दिला.

नेमकं प्रकरण काय?

वाशीमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून हॅाटेल व्यवस्थापकाला मारहाण चोप देण्यात आला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील सतरा प्लाझा मधील द टेस्ट ॲाफ पंजाब हॅाटेल व्यवस्थापकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. हॅाटेलमध्ये मराठी गाणी लावा, अशी मागणी करूनही याकडे व्यवस्थापकाने दुर्लक्ष केले. वारंवार सांगितल्यानंतरही हॉटेल व्यवस्थापकाने मराठी गाणी लावली नाहीत. याबाबत मनसे पदाधिकारी यांनी विचारणा केली असता हॉलेट व्यवस्थापकाकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या मनसेतील वाशी पदाधिकार्यांकडून हॅाटेल व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली.


हेही वाचा – धुळ्यात शिंदे गट विरुद्ध भाजपा? दादा भुसेंच्या मुलाचा उल्लेख भावी खासदार!