नवाबसेनेच्या पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’; मनसेची उद्धव ठाकरेंच्या पत्रावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील शिंदे गट आणि शिवसेना (shiv sena) हा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. एकनाथ शिंदेंसह बंड पुकारलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिवसैनिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Gajanan kale

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील शिंदे गट आणि शिवसेना (shiv sena) हा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. एकनाथ शिंदेंसह बंड पुकारलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिवसैनिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसोबत असलेल्या आमदारांना भावनिक पत्र लिहिले आहे. मात्र त्यांच्या या पत्रावर विरोधीपक्ष मनसेने निशाणा साधला आहे. “जो बूँद से गयी वो ‘पत्र’से नहीं आती…”, अशा शब्दांत मनसे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मनसे नेते गजानन काळे (gajanan kale) ट्विटरवरून शिवसने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी लिहिलेले पत्र गजानन काळे यांनी ट्विट करत “जो बूँद से गयी वो ‘पत्र’से नहीं आती…! खंजीर, कोथळा, लाकूडतोड्याची गोष्ट, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्र यानंतर नवाबसेनेच्या पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र ‘…”, असे लिहिले आहे.

उद्धव ठाकरेंची पत्रातून उर्वरित आमदारांना भावनिक साद

“शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो.”, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

हेही वाचा – “आता तरी अक्कल येईल असे…”; मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार दिपक केसरकर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह असलेला बॅनर घेऊन जात आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उभे असून, “चिंता करू नका साहेबांनी देलेले घड्याळ आहे आमल्याकडे”, असे बोलताना दाखवले आहे. हा फोटो ट्विट करत संदीप देशपांडे यांनी “आतातरी अक्कल येईल असे ‘चिन्ह’ दिसत नाही”, असे त्यांनी लिहिले आहे.


हेही वाचा – सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका