उद्धव ठाकरेंच्या ‘मुन्नाभाई’च्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई – गोरेगावच्या नेस्को मैदानावर झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना मुन्नाभाई संबोधले होते. यावेळी त्यानी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटासोबत मुंन्नाभाई आपल्यावर हल्ला करणार आहेत. त्यासोबत ही लढाई किती अटीतटीची होईल, हे लक्षात घ्या, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. या टीकेला मनसेचे नेते गजानन काळेंनी ट्वीटकरत प्रत्युत्तर दिले आहे.

ट्वीटमध्ये काय –

गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी काय टीका केली होती – 

काहीही करून उद्धव ठाकरेंना संपविण्याचा विडा भाजपाने उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे चेलेचपाटे मुंबई जिंकण्यासाठी काहीच दिवसात मैदानात उतरतील आणि त्याला आपल्या मुन्नाभाईची साथ असेल, पण शिवसेनेच्या नादाला लागाल तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करु नका. सेना म्हणजे रस्त्यावर पडलेलं झुरळं नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.