औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली, मनसे नेते गजानन काळेंचा इशारा

MNS leader Gajanan Kale's warning to owaisi for prayer in front of aurangzeb tomb
औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली, मनसे नेते गजानन काळेंचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेससाठी औरंगजेब सुफी संत आहे. अकबरुद्दीन ओवेसीने औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निषेधही करण्यात आला नाही. परंतु आता औरंग्याच्या थडग्यावर डोकं टेकवणाऱ्यांचा शिवप्रेंमींकडून बंदोबस्त करण्याची वेळ आले, असा इशारा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब सुफी संत वाटतो अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. यानंतर गजानन काळे यांनी राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आणला आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला औरंगजेब सुफी संत वाटतो याचा खरा चेहरा गजानन काळे यांनी समोर आणला आहे. राष्ट्रवादीसाठी औरंगजेब सुफी-संत? हा आहे राष्ट्रवादीचा खरा चेहरा.शिवरायांचे नाव तोंडी लावायला घ्यायचे,विचारधारा औरंग्याच्या अवलादींच्या उदात्तीकरणाची?ओवैसी औंरग्याच्या थडग्यावर डोके टेकवतो त्यावेळी राष्ट्रवादीवाले निषेध ही नोंदवत नाहीत?शिवप्रेमींनी यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आलीय अशा आशयाचे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे.

गजानन काळे यांनी एक फोटो ट्विट केलाय, या फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या मागे असलेल्या बॅनरमध्ये सुफी-संत आलमगीर बादशाह औरंगजेब राह की शान मे गुस्ताकी ना काबिले बरदाश्त असे लिहिले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग शहरजिल्हा औरंगाबादकडून उपोषण करण्यात आले होते. औरंगजेब नावाच्या चित्रपटाचे नावात बदल करावे व वादग्रस्त वाक्य काढून टाकण्याची मागणी या उपोषणामध्ये करण्यात आली होती. या आंदोलनाचा फोटो ट्विट करत गजानन काळे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावरसुद्धा निशाणा साधला आहे. शरद पवरांना सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार, तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलत आहात. यांचे हे जे सगळ राजकारण तुम्ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी हे राजकारण करणार, कोणी कोणाला भेटतय काय चाललंय असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.


हेही वाचा : मनसेचे हिंदुत्व रिझल्ट देणारे