येत्या २२ तारखेला ‘सिनेमा’ दाखवणार, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

mns Raj Thackeray

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना अजित पवारांनी मनसेच्या एका आमदाराचं उदाहरण देऊन निवडणूक आयोगावर टीका केली. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तुमचं मत काय?, असं विचारण्यात आलं. यावर राज ठाकरेंनी ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतोय.’ असं एका वाक्यात उत्तर देत अधिक बोलणं टाळलं. ज्या काही महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्यावर मी सविस्तर येत्या २२ मार्चला शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या दिवशी बोलणार आहे, असं मोठं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

निवडणूक आयोगाने दिलेला निकाल, हा दुर्दैवी आहे का, की पक्ष चांगल्या माणसाच्या हातात गेला, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आज मी त्यावर काहीच बोलणार नाही. मला कोणत्याही प्रकारचा ट्रेलर आणि टीझर दाखवायचा नाहीये. मी थेट येत्या २२ तारखेला सिनेमा दाखवणार आहे. त्यामुळे याविषयावर आता मला काहीच बोलायचं नाहीये, असं राज ठाकरे म्हणाले.

जर तरच्या हे सर्व पलिकडे गेलंय का?, राजकारणाचा सर्व चिखल झालाय. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. विरोध असेल किंवा कोणत्याही प्रकारची गोष्ट असतील पण या सर्व गोष्टी आमने-सामने असायच्या, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं.

मनसेचे एकमेव आमदार हे राजू पाटील आहेत. त्यांचा उल्लेख करुन राज ठाकरे म्हणाले की, राजू पाटील यांनाही एकदा विचारात घेताय का? आम्ही बर्नोल घेऊनच बसलेलो असतो. असं सांगून त्यांनी आपला पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर काय वेदना होतात, हे अप्रत्यक्षपणे स्पष्टं केलं आहे.


हेही वाचा : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी? आशिष शेलार म्हणाले, काम अंतिम टप्प्यात…