घरताज्या घडामोडीआधी राजीनामा द्या नंतर काय घाण करायची ती करा, राज ठाकरेंची मनसे नेत्यांना तंबी

आधी राजीनामा द्या नंतर काय घाण करायची ती करा, राज ठाकरेंची मनसे नेत्यांना तंबी

Subscribe

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केले जात आहेत. या वक्तव्यासंदर्भात अनेक पक्ष आणि संघटना मोर्चे काढत आहेत. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नेत्यांना थेटं तंबी दिली आहे. आधी राजीनामा द्या नंतर काय घाण करायची ती करा, अशा कठोर शब्दांत राज ठाकरेंनी मनसैनिकांना सुनावलं आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पत्र पोस्ट केलं आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

पत्रात काय लिहिलंय?

- Advertisement -

सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची, असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे खपवून घेतलं जाणार नाही, असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.

- Advertisement -

माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या, अशी तंबी राज ठाकरेंनी नेत्यांना दिली आहे.


हेही वाचा : चीनमधला नवा व्हेरियंट महाराष्ट्रात आढळला नाही; केंद्राकडून सतर्कतेचे आदेश, आरोग्यमंत्र्यांची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -