घरमहाराष्ट्रराज ठाकरे आजपासून 22 सप्टेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर; वेगवेगळ्या जिल्ह्यांना देणार भेट

राज ठाकरे आजपासून 22 सप्टेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर; वेगवेगळ्या जिल्ह्यांना देणार भेट

Subscribe

महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. आजपासून 22 सप्टेंबरपर्यंत म्हणजे पाच दिवस राज ठाकरे विदर्भाचा आढावा घेणार आहे. राज ठाकरे दौऱ्यासाठी नागपूरात दाखल झाले असून थोड्या विश्रांतीनंतर ते सर्वप्रथम नागपूरात अनेक आढावा बैठका घेणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भात मनसेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 2019 च्या निवडणुकांनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नागपूरात आल्याने मनसैनिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मनसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात नागपूर रेल्वे स्थानकावर राज ठाकरेंचे स्वागत केले.

या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. यावेळी पक्ष बांधणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका घेणार आहेत. यात आज सकाळी 11 वाजता रवी भवन सर्किट हाऊसवर राज ठाकरे नागपूर शहर आणि ग्रामीण मधील कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बैठका करतील. यानंतर उद्या म्हणजे 19 सप्टेंबर रोजी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत ते नागपूरात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याच दिवशी ते चंद्रपूरसाठी रवाना होणार आहेत. चंद्रपुरात त्यांचं जंगी स्वागत होईल आणि विभागवार बैठका होतील. चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, वर्धा असा दौरा करत ते पुन्हा अमरावतीत येणार आहे. अमरावतीतही ते विभागवार बैठका घेत ते पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलतात आणि त्यांच्या दौऱ्याचा मनसेला कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर 22 सप्टेंबर रोजी राज ठाकरे मुंबईत परततील.


राज ठाकरे आजपासून 22 सप्टेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर; वेगवेगळ्या जिल्ह्यांना देणार भेट


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -