घरताज्या घडामोडीमनसेला 'किंग' बनायचंय 'किंगमेकर' नाही, बाळा नांदगावकरांची शिवतीर्थावरील बैठकीनंतर प्रतिक्रिया

मनसेला ‘किंग’ बनायचंय ‘किंगमेकर’ नाही, बाळा नांदगावकरांची शिवतीर्थावरील बैठकीनंतर प्रतिक्रिया

Subscribe

कुठल्या विभागात कोणती टीम जाणार याची यादी संध्याकाळी देण्यात येणार आहे. या यादीसोबत तिकडे जाऊन काय काम करायचे त्याची लेखी स्वरुपात माहिती देण्यात येणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि नेते मंडळींची बैठक बोलावली होती. शिवतीर्थावर ही बैठक घेण्यात आली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची होती. मनसेकडून टीम स्थापन करण्यात येणार असून या टीम महापालिकांच्या निवडणुकीबाबत अहवाल सादर करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसेच मनसेला आता किंग बनायचे आहे किंग मेकर नाही असे वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी काही सूचना दिल्या असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवतीर्थावर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बैठकीबाबतची माहिती नांदगावकर यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते मंडळी, सरचिटणीस आणि प्रमुख ६० ते ६५ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक ठिकाणी जाऊन कशी करायची त्याची सर्व माहिती आणि सूचना दिल्या आहेत. कुठल्या विभागात कोणती टीम जाणार याची यादी संध्याकाळी देण्यात येणार आहे. या यादीसोबत तिकडे जाऊन काय काम करायचे त्याची लेखी स्वरुपात माहिती देण्यात येणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

- Advertisement -

टीमच्या अहवालानंतर निवडणुकीची तयारी करण्यात येणार आहे. १४ तारखेपर्यंत आता जी पुनर्ररचित वॉर्ड रचना झाली आहे. त्यामध्ये आपल्याला काही सूचना करायच्या आहेत का? घ्यायच्या आहेत का? त्यासुद्धा कराव्यात अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

मुंबईबाबत अद्याप चर्चा नाही

मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत अद्याप चर्चा झाली नहाी. मात्र मुंबईसोडून, नाशिक, पुणे आणि इतर पालिकांबाबत चर्चा झाली आहे. त्या त्या ठिकाणी आता टीम जाणार आहेत. प्रत्येक टीममधून प्रत्येकी अहवाल देण्यास सांगितले आहे. यानंतर एकदा कोर टीमची बैठक होईल आणि मुंबईत कोणती टीम काम करणार याबाबत ठरवण्यात येणार आहे. या टीमध्ये ३ ते ४ सदस्य असतील असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

मनसेला किंगमेकर बनायचंय

दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, आरोप प्रत्यारोप हे वर्षानुवर्षे होत आले आहेत आणि सुरुच राहणार आहेत. परंतु लोकांच्या समस्या आणि अ़डचणी त्याच ठिकाणी आहेत. म्हणून त्यांच्या समस्यांवर लक्ष देऊन पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे त्या दृष्टीकोनाने पुढे जाऊ असेही ते म्हणाले आहेत. यावेळी मनसे आगामी निवडणुकीमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत असेल का? असा प्रश्न करण्यात आला. यावेळी नांदगावकर म्हणाले की, निश्चितपणे आम्ही किंगमेकर कशाला आम्हाला तर किंग बनायचे आहे. आम्हाला किंग मेकर कशाला बनवत आहात. आम्ही किंग होणार असल्यामुळे तो विषय येत नाही. ज्यांना आमच्यासोबत यायचे असेल ते येतील.

प्रत्यक्षात जाऊन काम करा, राज ठाकरेंचे आदेश

राज ठाकरे यांनी नेते मंडळी, सरचिटणीस, पदाधिकारी यांच्या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन काम करा. प्रत्येकाने स्वतःचा अहवाल द्यावा, अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रभागांचा अभ्यास करण्यासाठी मनसेने समित्या स्थापन केल्या आहेत. प्रत्येक समितीत ३-४ सदस्य असणार आहेत. याशिवाय प्रभाग पुनर्रचना त्यात ज्या काही सूचना असतील तर त्या सर्वांनी द्या अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत


हेही वाचा : देशाची अर्थव्यवस्था ढासळली, बेरोजगारी वाढण्यासाठी मोदी जबाबदार, नवाब मलिकांचा पलटवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -