घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याच्या आड लबाडी लपवण्याचं सामर्थ्य; मनसेचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याच्या आड लबाडी लपवण्याचं सामर्थ्य; मनसेचा हल्लाबोल

Subscribe

शिंदे आणि ठाकरे गटाच्या चिन्हाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह गोठवल्याने मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेंकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे आणि ठाकरे गटाच्या चिन्हाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्याने मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल”, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

- Advertisement -

संदीप देशपांडे यांच्यासह मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “जुलै महिन्यात केलेली भविष्यवाणी आता खरी होताना दिसत आहे. उद्याच्या वर्तमानपत्रात जाहिरात आली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. धनुष्यबाण डोहाळे जेवणसाठी भाड्याने देणे आहे…!”, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं असल्याने आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह शिंदे आणि ठाकरे यांना वापरता येणार नाही. तसंच, शिवसेनेच्या नावाचाही वापर करता येणार नाही. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाची शनिवारी 4 तासांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या इतिहासात गेली 33 वर्ष ‘धनुष्यबाण’ हा शिवसेनेची ओळख बनला होता. 1989 नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेने धनुष्यबाणावर लढवल्या होत्या. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धनुष्यबाणाचे चिन्ह पूरक असेच होते. त्याआधी म्हणजे 1968 मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल तलवार या चिन्हावर लढवली होती. 1980 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळाले होते. तर 1985 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, बॅट बॉल अशी वेगळी चिन्हे मिळाली होती.


हेही वाचा – ढाल-तलवार ते धनुष्यबाण शिवसेनेने ‘या’ चिन्हांवर लढवल्या होत्या पूर्वीच्या निवडणुका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -