घरताज्या घडामोडी"मटणकरीं'नी जरा सांभाळून...''; संदीप देशपांडेंचा अमोल मिटकरींना धमकीवजा इशारा

“मटणकरीं’नी जरा सांभाळून…”; संदीप देशपांडेंचा अमोल मिटकरींना धमकीवजा इशारा

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली. त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या टीकेला मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत आमदार मिटकरींना थेट धमकी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली. त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या टीकेला मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत आमदार मिटकरींना थेट धमकी दिली आहे.

मिटकरी यांच्या टीकेनंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मिटकरींना धमकी वजा इशारा ट्विट करत दिला आहे. “राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या ‘मटणकरीं’नी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत राहायचे काय समजले?” असा धमकी वजा इशारा संदीप देशपांडे यांनी मिटकरींना दिला आहे.

- Advertisement -

अमोल मिटकरींची टीका

राज ठाकरे यांचा अमोल मिटकरींनी खाज ठाकरे म्हणून उल्लेख केला. पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाही. मात्र राज ठाकरे चांगल्या नकला करतात, चांगला टाइमपास आहे. अशी खोचक टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे. यावेळी बोलताना शरद पवारांवर बोलेले म्हणून त्यांना खाजसाहेब बोललो असेही मिटकरी यांनी म्हटलं. तर निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोके आणि त्यात मेंदू दिला आहे, पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवायचा यांचे भान दिले आहे. अस टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. तर मुस्लिम समाजाने हनुमान चालिसेला कधी विरोध केला असा, प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

औरंगाबादेत सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेत हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत केलेल्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच, येत्या ३ मे पर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे आदेश दिले. यानंतर मुंबईसह देशभरात वातावरण तापलं आहे. या सभेनंतर राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेणार असल्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या सभेआधीच औरंगाबादमध्ये मनसेच्या इशाऱ्याचे पडसाद दिसू लागले आहेत. अशातच औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, परवानगी नसल्यास कारवाई करण्यात येईल असं म्हटलं.


हेही वाचा – परवानगीशिवाय भोंगा वाजवण्यास मनाई; राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेआधीच पोलीस आयुक्तांचा आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -