मनसेच्या टार्गेटवर पुन्हा ठाकरे गट; भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर थेट ईडीला पाठवलं पत्र

mns leader sandeep deshpande letter to ed corruption allegations on bmc during corona

मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसतयं. मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेची ( ठाकरे गट) सत्ता आहे. मात्र ही सत्ता उलथून लावण्यासाठी आता सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकार आणि मनसेकडून प्रयत्न सुरु आहे. यात भाजप आणि मनसेने आता मुंबई महापालिकेत कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपांची राळ उठवली आहे. यात मनसेने आता पुन्हा शिवसेनेच्या काळात मुंबई महापालिकेच्या कारभार भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत थेट ईडीलाच पत्र पाठवलं आहे. यंदा आपल्या हाती भक्कम पुरावा लागल्याचं नमूद करत मनसेने हे पत्र पाठवलं आहे.

दरम्यान मुंबई महानगर पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला तसेच कोविड सेंटरमधील वेगवेगळ्या सेवांच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाला असे आरोप करत मनसेने पालिकेत आत्तापर्यंत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली. इतकचं नाही तर याबाबत आता पुरावाही हाती लागल्याचं सांगितलं आहे, तसा उल्लेख मनसेने पत्रात केला आहे.

मनसेच्या पत्रात नेमक काय म्हटलं आहे?

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तांना मनसेने याबाबत एक सविस्तर पत्र पाठवलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या नावाने हे पत्र गुन्हे शाखेला देण्यात आलं आहे. या पत्रात मनसेने म्हटलं की, कोरोना महामारीच्या काळात पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना युवासेनेच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला गेला. कोरोना काळाती घोटाळ्याची चौकशी कॅगमार्फत करण्याची मागणी होत होती. पण कॅगला दिलेल्या पत्रातमध्ये कंत्राटाची चौकशी करता येणार नाही असे उत्तर महापालिकेने दिले.

सुरुवातीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने भ्रष्टाचाराबाबत वारंवार वेगवेगळ्या पुराव्यासह आवाज उठवला गेला. परंतु यावेळेस घोटाळ्याचा भक्कम पुरावा आमच्या हाती लागला आहे. या काळात कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला वेगवेगळी कंत्राटे देण्यात आली. त्यामध्ये मालाड व रिचर्डसन कुडास, भायखळा, मुंबई. येथे करोना सेंटर उभारले होते. या सेंटरमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जेवण, लाँड्री, सॅनिटायझर पुरवठा असे वस्तु पुरविण्याचे कंत्राट युवासेना पदाधिकारी असलेल्या वैभव थोरात यांनी तयार केलेल्या ठक्कर अॅण्ड पवार कंपनी, शिवनेरी इंटरप्रायझेस, शिवचिदंबरम फार्मा, रमेश अॅण्ड असोसिएट, अर्का कंपनी, देवराया इंटरप्रायझेस, जयभवानी इंटरप्रायझेस व ग्रीन स्पेस रिएल्टी या कंपनी मार्फत दिले. या कंत्राटामागे कोणाचा सहभाग होता, याची चौकशी होणं गरजेच आहे, अशी मागणी मनसेने पत्रातून केली आहे.

उपरोक्त कंपनीने प्रत्यक्ष पुरवठ्यापेक्षा जास्त बिल सादर केली, त्यामध्ये प्रत्यक्ष 30 टक्के ते 40 टक्के वस्तु पुरवठा केला गेला आणि 100 टक्के वस्तु पुरवठा केला याची बिल दिली. जवळपास 25 ते 30 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर घोटाळा सहाय्यक आयुक्त व लेखा अधिकारी यांच्या संगनमताने झाला असल्याचे दिसते, असा आरोपही मनसेने या पत्रातून केला आहे.


अनिल देशमुखांची पत्राद्वारे देवेंद्र फडणवीसांकडे ‘ही’ मागणी, वाचा सविस्तर