Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंना अटक आणि तत्काळ जामीन, कोर्टाकडून मोठा दिलासा

Sandeep Deshpande

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) पोलिसांच्या (Police) हातावर तुरी देऊन पळाले होते. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या शिवतीर्थ (Shivteerth) या निवासस्थानाबाहेर एक महिला पोलीस देखील जखमी झाली होती. यावेळी त्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या प्रकरणी सत्र न्यायालयाने देशपांडेंचा अटकपूर्व जामीन (Pre-Arrest bail) मंजूर केला आहे. त्यामुळे कोर्टाकडून त्यांना मोेठा दिलासा मिळाला आहे.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी आज कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे. कोर्टाने अटकपूर्व जामीन देताना सांगितलं होतं की अटक झाल्यास १५ हजारांच्या जाचमुचलक्यावर तात्काळ सुटका करावी. देशपांडे आणि धुरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होता. सत्र न्यायालयाने या गुन्ह्यात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

आज सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडली – संदीप देशपांडे

आज सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे. अटकपूर्व जामीनाची सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. येत्या १ जून आणि १६ जून रोजी आम्ही पोलीस स्टेशनला हजेरी लावणार आहोत. तसेच कोर्टाने ज्या आम्हाला अटी आणि शर्थी लागू करुन दिलेल्या आहेत. त्यांचं आम्ही पूर्णपणे पालन करु, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली आहे.

मशिदींवरील भोंगे हटवा नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, अशा इशारा राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार, मनसैनिकांनी ४ मे रोजी मुंबईच्या काही भागात मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरूवात केली होती. पण देशपांडे यादरम्यान बेपत्ता होते. पोलीसही त्यांचा शोध घेत होते. परंतु यावेळी पोलिसांनी देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक केली होती.

दरम्यान, शिवाजी पार्क येथील पोलिसांनी या प्रकरणी देशपांडे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कलम ३५३, २७९ आणि ३३६ अनव्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. देशपांडे आणि धुरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्याविषयीच्या सुनावणी अंती न्यायालयाने त्यांचे अर्ज मंजूर केले. त्यानंतर या दोघांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती.


हेही वाचा : Sandeep Deshpande At Shivteerth: जामीन मिळताच संदीप देशपांडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट