Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर केलेल्या अत्याचाराचा अनुभव जनता सध्याच्या काळात घेतेय -...

प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर केलेल्या अत्याचाराचा अनुभव जनता सध्याच्या काळात घेतेय – मनसे

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर केला हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात येत्या काळात कठोर निर्बंध लादण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात लॉकडाऊन अटळ असल्याचे मानले जात आहे. पण याला विरोधी पक्ष नेते विरोध करत आहे. याच अनुषंगाने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधून त्यांची तुलना ब्रिटीशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी केली आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी संदीप देशपांडे यांनी फेसुबक लाईव्ह देखील केले होते. या लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘१८९७ साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँड ने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत.’

- Advertisement -

तसेच मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हला प्रत्युत्तर दिले की, ‘मुख्यमंत्र्यांकडून रस्त्यावर उतरून कशी मदत करायची आता हे शिकण्याची गरज नाही. कोरोनाच्या संकटामध्ये मनसे सैनिकांनी लाठ्या मारणाऱ्या पोलिसांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना शक्य होईल तितकी मदत केली आहे. सरकारकडून कोणतीच मदत करण्यात आली नाही आहे. कोरोनाच्या काळात जम्बो कोविड सेंटर उभारून आपल्या ओळखीच्या लोकांना काम देणे आणि पैसे पुरवणे हेच सरकारने काम केले आहे,’ अशी टीका संदीप देशपांडे यांनी शनिवारी केली.


- Advertisement -

हेही वाचा – Corona: मुंबईतील ‘हे’ आहेत कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट


 

- Advertisement -