घरताज्या घडामोडी"एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे..."; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

“एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

राज्यसभा निवडणुकीला (rajya sabha elections) अवघे तीनच दिवस शिल्लक असल्याने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) खासकरून शिवसेनेची जुळवाजुळव अजूनही सुरू आहे. अशातच शिवसेना एमआयएमची मदत घेणार का, याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली.

राज्यसभा निवडणुकीला (rajya sabha elections) अवघे तीनच दिवस शिल्लक असल्याने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) खासकरून शिवसेनेची जुळवाजुळव अजूनही सुरू आहे. अशातच शिवसेना एमआयएमची मदत घेणार का, याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे. “तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा. बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागे साठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे”, अशा शब्दांच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. (Mns leader sandeep deshpande slams uddhav thackeray may taking help of aimim)

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे. “तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा. बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.”, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यसभा निवडणूक : छोटे पक्ष, अपक्षांची भूमिका गुलदस्त्यात; आघाडी आणि भाजपचा जीव टांगणीला

मतांची जुळावाजुळव

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधीपक्ष भाजपा मतांची जुळावाजुळव करत आहेत. आमदारांचा एक-एक मत महत्वाचे असल्याने सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी आमदारांना एकत्र ठेवले आहे. शिवाय, अपक्ष आणि इतर पक्षाचा पाठींबा घेण्यासाठीही दोघांनी कंबस कसली आहे. यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी विशेष म्हणजे शिवसेना आमदारांच्या संख्याबळासाठी एमआयएमची मदत घेणार का, याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकीकडे ही चर्चा आणि विजयातरीता आमदारांच्या पाठींब्यासाठी केलेली धडपड, तर दुसरीकडे याच चर्चांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – राज्यसभा निवडणूक भाजपाने लादली – सतेज पाटील

असदुद्दीन ओवेसींची खुली ऑफर

“कुणाला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी जगजाहीर मागावा. आम्ही तो नक्कीच देऊ”, अशी खुली ऑफर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीला दिली आहे. एमआयएमकडे दोन मते असल्यामुळे या ऑफरवर शिवसेना आणि महाविकास आघाडी काय भूमिका घेतात. विशेष म्हणजे बैठकीसाठी आमंत्रण देण्यासाठी त्यांच्याकडे कोण जाणार, याचीच सर्वांना उत्सुकता आहे.


हेही वाचा – विधान परिषदेची लगीनघाई; निंबाळकर, खडसे, अहिर, दरेकरांच्या उमेदवारीची चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -