महिला पोलिसाला धक्का लागल्याचं एक जरी फुटेज समोर आलं तर मी राजकारण सोडेन : संदीप देशपांडे

sandeep deshpande

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच त्यांनी परिषदेतून संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. जो गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आला होता, तो खोटा गुन्हा होता. त्या खोट्या गुन्ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस आम्हाला शोधत होते. मला असं वाटतंय की, हे तुमच्या फुटेजमुळे स्पष्ट झालं. हे स्क्रीनशॉट आमच्या वकिलांनी न्यायालयात दाखवले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला नव्हता हे स्पष्ट झालं. तसेच महिला पोलिसाला आमचा कुठलाही धक्का लागला नव्हता. महिला पोलिसाला धक्का लागल्याचं एक जरी फुटेज समोर आलं तर मी राजकारण सोडेन, असं संदीप देशपांडे म्हणाले.

…एक जरी फुटेज समोर आलं तर मी राजकारण सोडेन

सोळा दिवसानंतर संदीप देशपांडे मुंबईत परतले याबाबत संदर्भ काय?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, देशपांडे म्हणाले की, सर्वात प्रथम मी सर्वांचे खूप आभार मानतो. पत्रकार आणि चॅनेलवाल्यांचं जे फुटेज होतं ते अगदी स्वयंस्पष्ट फुटेज होतं. जो गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आला. तो खोटा गुन्हा होता. त्या खोट्या गुन्ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस आम्हाला शोधत होते. मला असं वाटतंय की, हे तुमच्या फुटेजमुळे स्पष्ट झालं. हे स्क्रीनशॉट आमच्या वकिलांनी न्यायालयात दाखवले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला नव्हता हे स्पष्ट झालं. तसेच आमचा कुठलाही धक्का लागला नव्हता. सरकारने एकप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या विरोधात बोलू नये, यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला. परंतु आमचा कायदा व न्यायालयावर संपूर्ण विश्वास होता. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला.

कलमं लावण्यासाठी कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते. मला येईल ती कलमं लावू शकतात. शेवटी सरकार त्यांचं आहे. उद्या तुम्ही ३७६ चं कलम लावालं. कलम लावायला काय आहे. परंतु तुम्ही जे कलम लावताय तशी घटना घडली आहे का, आमचा महिला पोलिसाला धक्का लागलाच नव्हता. मग तुम्ही आम्हाला कशासाठी जबाबदार ठरवलंत, असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला. जर त्या महिला पोलिसाला धक्का लागल्याचं एक जरी फुटेज समोर आलं तर मी राजकारण सोडून देईन, असं संदीप देशपांडे म्हणाले.

देशपाडेंनी राज ठाकरेंचे मानले आभार 

संदीप देशपांडे यांच्या कठीण परिस्थितीत आणि कुटुंबियांच्या पाठिशी उभे राहिल्यामुळे देशपाडेंनी राज ठाकरेंचे आभार मानले. तसेच आमचे सर्व नेते मंडळी आणि महाराष्ट्र सैनिक उभे राहीले. माझ्यावर तुमचा राजकीय सूड होता परंतु संतोष धुरी यांनी तुमचं काय वाईट केलं होतं. धुरी तर बाजूला उभे होते. मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला. तसेच त्यांना तुरूंगात अत्यंत वाईट परिस्थितीत ठेवण्यात आलं, असं देशपांडे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील दौरा तूर्तास स्थगित केला आहे, याबाबत प्रश्न विचारला असता देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांची २२ मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेतून त्यांना जे सांगायचं आहे. त्याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करतील.

देशपांडेंचा राऊतांवर पलटवार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर असं म्हटलं होतं की, राज ठाकरेंना आम्ही पण सहकार्य केलं असतं. परंतु यावेळी संदीप देशपांडे यांनी राऊतांवर पलटवार केला. ज्यांनी आमचे रातोरात नगरसेवक चोरले. तसेच आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाराष्ट्र सैनिकांना १४ दिवस तडीपार केलं. त्यांच्याकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा ठेवावी का?, असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा : Sandeep Deshpande At Shivteerth: जामीन मिळताच संदीप देशपांडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट