वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो; शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर मनसेचा हल्लाबोल

mns leader sandeep deshpande targeted uddhav thackeray on shiv sena dussehra rally

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र पालिकेने परवानगी नाकारताच दोन्ही गटाने कोर्टात धाव घेतली. यावेळी उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. मात्र विरोधकांकडून त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नसून टोमणे सभा असल्याचा टोला शिंदे गटाने लगावला आहे. तर आता मनसेही ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो. असा ट्विट करत त्यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. यापूर्वीही राज ठाकरेंनी वारसा विचारांचा असतो असं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता दसरा मेळाव्यावरून मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.


यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागले असे वागू नये असे आवाहन केले. हायकोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी आपली ही भूमिका मांडली होती. मात्र हायकोर्टाच्या निर्णयानंतरही दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

दसरा मेळावा नसून टोमणे सभा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळावा सुरु केला, त्यांची टॉगलाईन होती हिंदुत्ववादी विचारांचे सोनं लुटण्यासाठी या, आता ज्यांना परवानगी मिळाली त्याठिकाणी हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळणार नाहीत. तर टोमणे ऐकायला मिळतील. गद्दार, वज्रमूळ, खोके, बेईमानी हेच शब्द असतील. ही टोमणे सभा असेल आणि खरा हिंदुत्ववादी विचार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत ऐकायला मिळेल, अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.


देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; राज्यात 611 नव्या रुग्णांची नोंद