घरताज्या घडामोडीमुंबईत शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप

मुंबईत शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप

Subscribe

मुंबई महापालिका निवडणूक तोडांवर आली असून भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्यात युतीची चर्चा रंगत आहे. परंतु शिंदे गटाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिंदे गटासोबत जवळीक वाढली आहे. तरी सुद्धा संजय नाईकांनी गंभीर आरोप केला आहे.

शिंदे गटाकडून विविध प्रकारची आमिष आणि पदांची लालच दाखवली जात आहे. एकप्रकारे मनसे पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न शिंदे गटातून होत आहे. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या जात आहे, असं संजय नाईक म्हणाले.

- Advertisement -

मनसे-शिंदे गट एकत्र येणार नाही. मनसे निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. भायखळ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शिंदे गटाकडून आमिष दिली जात आहे. वेगवेगळी पदं देणार असल्याचे सांगत आहे. शिंदे गटासमोर आधीच समोर एक शत्रू आहे, पण ते आणखी शत्रू का निर्माण करत आहे, त्याबद्दल कळत नाही, असंही नाईक म्हणाले.

शिंदे गटातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज द्यावी. आणखी शत्रू निर्माण करून त्यांच्या पायावर धोंडा मारून घेऊ नये, असा सल्ला देखील नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

- Advertisement -

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस ‘स्पायडरमॅन’ आहेत का? सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून नाना पटोलेंची टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -