मनसेत नाराजी; पुण्याचे वसंत मोरे भाषण करू न दिल्याने नाराज

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. या सरकार स्थापनेनंतर इतर पक्षात आणि छोट्यामोट्या गटात नाराजीचे वारे सुरू झाले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही नाराजीचा सूर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (रविवार) गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्षांचा मेळावा घेणार आहेत.

Vasant More commented on the threat to his son

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. या सरकार स्थापनेनंतर इतर पक्षात आणि छोट्यामोट्या गटात नाराजीचे वारे सुरू झाले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही नाराजीचा सूर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (रविवार) गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्षांचा मेळावा घेणार आहेत. मात्र, या मेळाव्यात मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे यांना पुणे शहरातील मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आले. परंतु त्यांना भाषणच करू दिले नाही. त्यामुळे वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

मनसेचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आपली नाराजी स्पष्ट केली. “मी नाराज नाही तर कार्यकर्ते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये सर्व कोअर कमिटीचे मेंबर आले होते. मी ही त्या स्टेजवर बसलो आहे तर मला बोलू दिले जाईल, असे कार्यकर्त्यांना वाटले होते. परंतु, मला बोलायची संधी दिली नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो. तुम्ही का भाषण नाही केलं? असा प्रश्न विचारला. मी म्हटलं, भाषणाच्या यादीत माझे नावच नाही तर मी कसे भाषण करणार?, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील नेस्को ग्राऊंडवर धडाडणार आहे. मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात आज ते कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत. त्यामुळे आजच्या भाषणात ते कोणत्या मुद्द्यांवर बोलतात, कोणावर टीका करतात याकडे अवघ्या महाराष्ट्र लक्ष लागलं आहे.

भारत जोडो यात्रा, हरहर महादेव सिनेमाच्या निमित्ताने उद्भवलेला वाद, स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या अपमानजनक वक्तव्यामुळे उद्भवलेला वाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान या सर्वांवर ते बोलण्याची शक्यता आहे. मशिदीवरील लाईड स्पीकरचा मुद्दा मनसेने उचलून धरला होता. मशिदीच्या लाऊड स्पीकरविरोधात उगारलेल्या आंदोलनात त्यांना बऱ्यापैकी यश आलं होतं. त्यामुळे आजच्या भाषणात ते कोणता मुद्दा उगारून काढतात हे पाहावं लागणार आहे.


हेही वाचा – मुंबईच्या नेस्को मैदानात आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, पक्षाला मिळणार नवी दिशा?