घरताज्या घडामोडीनवी सुरुवात, मनसेचं 'भाजप स्टाईल' अधिवेशन!

नवी सुरुवात, मनसेचं ‘भाजप स्टाईल’ अधिवेशन!

Subscribe

हिंदुत्वाचा स्वीकार केल्यामुळे मनसे भाजपसोबत जाणार असल्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसेचं महाअधिवेशन देखील भाजपच्याच स्टाईलमध्ये होणार असल्याचं दिसून येत आहे.

मनसेचे महाअधिवेशन २३ जानेवारी रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानात होत असून, या अधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या पक्षाची नवी दिशा ठरवणार आहेत. विशेष म्हणजे मनसेच्या झेंड्याचा रंगही बदलणार असून, महाअधिवेशनात हा नवा झेंडा सगळ्यांच्या समोर येणार आहे. शिवसेनेची हिंदुत्वाबाबतची बदललेली भूमिका यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा रेटून धरण्याचा विचार केला असल्याचं बोललं जात आहे. त्यावरच उद्याच्या अधिवेशनामध्ये खुलासा होण्याची शक्यता आहे. मात्र, राज ठाकरे आणि त्यांची मनसे भाजपच्या अधिक जवळ जात असल्याचंच या सगळ्या घडामोडींमधून दिसून येत आहे. भाजपप्रमाणेच भगव्या रंगाचा झेंडा स्वीकारण्याबरोबरच इतरही अनेक बाबी मनसेने भाजपसारख्या केल्या आहेत.

मनसेचे भाजपच्या पावलावर पाऊल?

गेले काही दिवस जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपवर टीका करत होते ते सध्या भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत की काय असे मनसेच्या महाअधिवेशनाचा कार्यक्रम पाहिला तर लक्षात येते. भाजपचे मुंबईतले महाधिवेशन गोरेगाव नेस्को येथे घेण्यात येते. तसेच भाजपच्या महाअधिवेशनात देखील पक्षाचे काही ठराव मांडण्यात येतात. कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम दिले जातात. मनसेच्या महाअधिवेशनाचा कार्यक्रम देखील अशाच स्वरूपाचा दिसून येत आहे. हे महाअधिवेशन देखील गोरेगाव नेस्को येथेच होत आहे. महाअधिवेशनात काही ठराव मांडले जाणार असून, मनसेच्या कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम देखील आखून दिले जाणार आहेत.

- Advertisement -

असे असेल महाअधिवेशन…

या महाअधिवेशनाचे उदघाटन सकाळी ९ वाजाता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पक्षाचे नेते तसेच इतर मान्यवर मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारच्या सत्रात पक्षाचे काही नवीन ठराव मांडण्यात येणार असून, त्याला मंजुरी दिली जाणार आहे. तसेच कार्यकर्त्यांनी काही कार्यक्रम ठरवून दिले जातील. त्यानंतर राज ठाकरे यांचे भाषण होणार आहे.


व्हिडिओ पाहिलात का? २३ जानेवारीच्या अधिवेशनाआधी मनसेकडून ट्रेलर रिलीज!

झेंड्यासोबत मफलरचा रंगही बदलणार!

मनसेच्या या नव्या झेंड्यासोबतच मनसे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील मफलरचा रंग देखील बदलणार आहे. कार्यकर्त्यांच्या गळ्यात भगव्या रंगाचा मफलर दिसणार आहे. बुधवारी मनसेमध्ये जोगेश्वरी येथील जय जवान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना उद्या झेंड्यासोबत हा मफलरही बदलणार असे सांगितले.

उद्या आमच्या झेंड्याचा रंग बदलत आहे. झेंड्याबाबत जो आमच्या मनात भ्रम होता, तो राज ठाकरेंनी दूर केला आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या गळ्यातील मफलर देखील बदलेल असं साहेबांनी आज सांगितलं.

अविनाश जाधव, मनसे नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -