Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'मग तुमचा भोंगा...'; रात्रीच्या 1 वाजता फटाके फोडण्याची तक्रार करणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला...

‘मग तुमचा भोंगा…’; रात्रीच्या 1 वाजता फटाके फोडण्याची तक्रार करणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला मनसेचे प्रत्युत्तर

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवर मशिदींवरील भोंग्यांचा मद्दा उपस्थित केला आहे. एका मस्लीम व्यक्तीकडून रात्रीचा 1 वाजून गेला तरी, फटाके वाजत असल्याचे मुंबई पोलिसांना ट्विट केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवर मशिदींवरील भोंग्यांचा मद्दा उपस्थित केला आहे. एका मस्लीम व्यक्तीकडून रात्रीचा 1 वाजून गेला तरी, फटाके वाजत असल्याचे मुंबई पोलिसांना ट्विट केले. त्यावर मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी उत्तर देताना ‘दिवाळी असल्याने सहन करा’ असा सल्ला दिला. तसेच, ‘तुमची भोंग्यावरील अजान आजही सुरु आहे’ असेही त्यांनी यावेळी म्हटले. (MNS Manoj Chavan Slams Muslim man for complaint of Fire crackle)

हिंदूंना एकवटण्याचे चव्हाणांचे आवाहन

दिवाळीनिमित्त सर्वत्र फटाक्यांची आतशबाजी सुरू आहे. मुंबईच्या अनेक भागांत सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यात आले. मात्र, रात्रीच्या 1 वाजताही फटाके फोडत होते. त्यामुळे एका मुस्लीम व्यक्तीने ट्विटरला मुंबई पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली. सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे 2 वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचे ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे 4.30 वाजता फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी या दोन्ही ट्वीटरला उत्तर देत संबंधितांना कळवण्यता आल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

सलमान खान नाव असलेल्या मुस्लीम व्यक्तीच्या ट्विटनंतर मनसेने त्याला प्रत्युत्तर दिले. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर केले असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडे सहन करा कारण दिवाळी आहे”, असे त्यांनी म्हटले.

या ट्विटतनंतर मनोज चव्हाण यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत एकवटण्याचे आव्हान दिले. “ट्विट पाहून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. देवाच्या नावाखाली वर्षानुवर्ष आम्ही यांचे अजान ऐकत आहोत, आम्ही ते सहन करतोय ना. दिवाळी तर फक्त चार दिवस असते. काल पहिला दिवस असल्याने पहाटे लोक उठणारच. त्यांना इतका त्रास होत असेल तर त्यांच्या अजानचा आम्हाला किती त्रास होतो हे पाहिलं पाहिजे. माझा विषयच हा होता की, जसे हे सगळे एकत्र येतात आणि पोलिसांना ट्वीट करणं वैगेरे गोष्टी करतात. तशाच प्रकारे हिंदूही एकवटणं गरजेचं आहे. आपण एकवटलो तरच प्रत्युत्तर देता येईल”, असे मनोज चव्हाण यांनी म्हटले.

- Advertisement -

“आजही काही ठिकाणी हट्टापायी अजान सुरु आहे. त्यांनीही हा त्रास समजून घेण्याची गरज आहे. जर पोलिसांनी कारवाई केली तर त्याच्या पाठीशी मनसे ताकदीने उभी राहणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अशा तक्रारींकडे लक्ष देऊ नये. हिंदू एकटवणं, एकत्रित येऊन सण साजरे करणं हीच राज ठाकरेंची भूमिका आहे, म्हणूनच दिपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. फटाके काही १२ महिने वाजत नसतात. सणाच्या दिवशी आनंद व्यक्त करण्याची ती पद्धत असून प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे. यावर निदान हिंदूंनी तरी आक्षेप घेऊ नये. अशा तक्रारींना थारा दिला जाऊ नये. अजान बंद करा अशी विनंती आता सरकारच करणार असल्याचं आम्हाला समजलं आहे. आम्ही पहाटेची आऱतीही बंद केली आहे. हा निर्णय एकट्या समाज किंवा धर्मापुरता नाही. हिंदू देवी, देवतांच्या मंदिरातही हा नियम पाळण्यात आला आहे. जर आम्ही मान दिला आहे, तर मुस्लिम समाजानेही तो मान द्यावा. हिंदुत्ववादी सरकार आलं आहे असा विश्वास द्यायचा असेल तर कारवाई होणे गरजेचे आहे. १०० टक्के बंद झालं तरच हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आलं आहे असं म्हणू शकतो. जी विचारधारा चुकीची आहे आम्ही तिचा निषेध करतो. दिवाळीनंतर मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. आपला देश कुठे जातोय हे पुराव्यानिशी सांगणार आहे. हिंदुत्ववादी संघटना किंवा हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण जर ‘इस्लाम खतरे में है’ अशी बांग आली तर १२ देश पाठीशी उभे राहतील. पण जर हिंदुत्व धोक्यात असेल तर मदतीला फक्त नेपाळ आहे, इतर कोणी संघटना नाही. त्यामुळे हिंदूंनी एकटवणं, एकत्र सण साजरं करणं महत्त्वाचं आहे”, असेही चव्हाण यांनी म्हटले.


हेही वाचा – हुश्श्य! दोन तासांनंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत, नेटकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -