Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लॉकडाऊनमध्ये लग्नाला जागा मिळेना, मनसे शाखाच झाली मंगल कार्यालय

लॉकडाऊनमध्ये लग्नाला जागा मिळेना, मनसे शाखाच झाली मंगल कार्यालय

विवाहसोहळा ठरला होता पण टाळेबंदीच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय उपलब्ध झालं नाही

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोना साखळीला रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर लॉकडाऊन केला आहे. या लॉक़डाऊनमध्ये विवाह सोहळ्याला २ तासाची परवानगी देत २५ मानसांच्या उपस्थित पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अनेक जोडप्यांचा हिरमोड झाला आहे. परंतु ठरल्या मुहुर्तावर लग्न करण्यासाठी मुंबई- भांजुपमधील वधु-वरांच्या कुटुंबीयांना लग्न करण्यासाठी मंगल कार्यालय मिळत नव्हते. शेवटी त्यांनी मनसेच्या शाखाध्यक्षांना फोन केला आणि मनसे त्यांच्या मदतीला धावून गेली आहे. मनसेच्या शाखेमध्येच मोजक्या माणसांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला आहे.

विवाहसोहळा ठरला होता पण टाळेबंदीच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय उपलब्ध झालं नाही. मुंबई-भांडुपमधील वधु-वर कुटुंबीयांनी पक्षाच्या शाखेशी संपर्क साधला. मग काय शाखाध्यक्ष सुनील नारकर ह्यांनी पक्षाच्या शाखेतच सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था केली व कोव्हीड नियमावलीच्या नियमानुसार विवाह संपन्न झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक जनतेच्या प्रत्येक प्रसंगात धावून जातात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा हे जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या वास्तू आहेत.

विवाहसोहळा ठरला होता पण टाळेबंदीच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय उपलब्ध झालं नाही. मुंबई-भांडुपमधील वधु-वर कुटुंबीयांनी…

Posted by MNS Adhikrut on Friday, April 30, 2021

काय आहे प्रकरण

- Advertisement -

मनसे नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाते. मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला फोन केला किंवा संपर्क साधला तर आपले काम होणारच असाच काहिसा विश्वास या वधु-वरांच्या कुटुंबीयांनाही आला आहे. कोरोनाच्या साथीमुळे राज्य सरकारने २ तासात लग्न उरकरण्याचे आदेश दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन झाले तर ५० हजार रुपयांचा कठोर दंड आकारण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. यामुळे अनेक मंगल कार्यालये लग्न सोहळ्यासाठी नकार देत आहेत. अशात मुंबई- भांडूपच्या वधु-वर कुटुंबीयांना मंगल कार्यालय उपलब्ध झाले नाही. त्यामुळे मग त्यांनी मनसेच्या शाखेशी संपर्क साधला होता. यानंतर शाखाध्यक्ष सुनील नारकर यांनी पक्षाच्या शाखेतच लग्न सोहळ्याची तयारी केली. नियमांचे पालन करुन हा सोहळाही मनसेने चांगल्यापद्धतीने पार पाडला आहे. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून गेली आहे.

- Advertisement -