घरमहाराष्ट्रमनसे आमदाराने स्वखर्चाने बांधला आखाडा

मनसे आमदाराने स्वखर्चाने बांधला आखाडा

Subscribe

मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला संपुर्ण राज्यात जुन्नर ही एकच जागा मिळाली, मात्र तेव्हापासुन पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे जुन्नर तालुक्यात गेलेले नाहीत. मात्र मंगळवारी जुन्नरकरांची ही इच्छा राज ठाकरे यांनी पूर्ण केली.

मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला संपुर्ण राज्यात जुन्नर ही एकच जागा मिळाली, मात्र तेव्हापासुन पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे जुन्नर तालुक्यात गेलेले नाहीत. मात्र मंगळवारी जुन्नरकरांची ही इच्छा राज ठाकरे यांनी पूर्ण केली. जुन्नर तालुक्यात आमदार शरद सोनवणे यांनी स्वखर्चातुन साकारलेल्या स्वर्गिय मा. आमदार श्रीकृष्ण (झांबरशेठ) तांबे स्टेडियम लोकार्पण सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.शिवरायांच्या जन्मभुमीत मनसेने विधानसभेत खाते खोलले. आमदार शरद सोनवने यांच्या रुपाने मनसेचा एकांडा शिलेदार विधानभवनात धडकला. मात्र पक्षाध्यक्षांनी जुन्नर तालुका मतदार संघाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवस खदखद पहायला मिळत होती. विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या सभेनंतर तब्बल चार वर्षानंतर राज ठाकरेंचे पाऊल शिवभुमीला लागल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. आमदार शरद सोनवने हे गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या सभा,बैठकांमध्ये दिसत नव्हते. मात्र मागील महिन्यात पुण्यात झालेल्या सभेत शरद सोनवनेनी दमदार भाषण करुन “मी तुमचाच शिलेदार” असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसे नेते अनिल शिदोरे, जिल्हाध्यक्ष समीर थिगळेंच्या यांच्या विनंतीवरून राज ठाकरे जुन्नर विधानसभा मतदार संघात दाखल झाले.

राज ठाकरेंच्या दौर्‍यामुळे मनसेमय वातावरण…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दैवत मानून शिरुर लोकसभा मतदार संघात काम करणारे कार्यकर्ते गेल्या चार दिवसांपासुन तयारीला लागले होते. नेहमीच वाहतुक कोंडीच्या विळख्यात असणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडीचा सामना राज ठाकरेंना करावा लागू नये यासाठी महामार्गावरुन दुचाकी रॅली काढुन, चौकाचौकात आपल्या नेत्यासाठी कार्यकर्ते उभे असलेले पहायला मिळाले. राज ठाकरेंच्या दौर्‍यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आला आहे. राज ठाकरेंनी ‘फक्त लढ म्हणा ’ या एका हाकेला भुकेला असलेला कार्यकर्ता त्यांच्याकडे आस लावुन बसला आहे.

- Advertisement -

कुस्त्यांचा आखाडा लोकार्पण सोहळ्यात सहभागी होताना हे सर्व पाहिल्यावर कळते की, माझा एकमेव आमदार स्वखर्चातुन आखाडा बांधतो, मात्र महाराष्ट्रातील अनेकजण दुसर्‍याच्या खिशातील काढुन आपल्या खिशात घालतात. महाराष्ट्रातील 288 आमदार जर मला मिळाले तर महाराष्ट्राचे सोनं करीन. -राज ठाकरे- मनसे अध्यक्ष

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -