घरमहाराष्ट्रआम्ही 'धन'से कमी आहोत; पण 'मनसे' लई आहोत, मनसे आमदार राजू पाटलांचे...

आम्ही ‘धन’से कमी आहोत; पण ‘मनसे’ लई आहोत, मनसे आमदार राजू पाटलांचे शरद पवारांना उत्तर

Subscribe

ठाणे –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मनसेला टोला लगावला होता. यावेळी साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना आमदार निवडून आणता येत नाही त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचे?,असे शरद पवार म्हणाले. याला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिले आहे.

मनसेचे प्रत्युत्तर… –

- Advertisement -

मनसे आमदार राजू पाटील यांनी शरद पवारांच्या या टीकेला उत्तर दिले. आज बोटं मोजताय, उद्या बोटे मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल. ‘आम्ही ‘धन’से कमी आहोत. पण ‘मनसे’ लई आहोत, असेही राजू पाटील यांनी म्हटले आहे. संधी सर्वांना मिळते, असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. ‘आदर देतोय, आदर घ्या’, असेही राजू पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शरद पवार काय म्हणाले –

शरद पवारांची बुधवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवारांसोबतची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणी संग्रहालयातील प्राणी आहे, अशी टीका मनसेकडून केली जात आहे. या राजकीय वक्तव्याकडे तुम्ही कसे पाहता?, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर पवारांनी मनसेच्या मर्मावर बोट ठेवत या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देत टोला लगावला. प्राणी वगैरे संदर्भातील उल्लेख मी येथे करणार नाही. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना आमदार निवडून आणता येत नाही त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचे?, असा खोचक प्रतिप्रश्न करत शरद पवार यांनी मनसेला टोला लगावला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -