घरमहाराष्ट्रबंड झाले, आता थंड झाले? मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

बंड झाले, आता थंड झाले? मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Subscribe

शिंदे गटाने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. मात्र सरकार स्थापनेनंतर एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा वाटपावरून चलबिचल सुरु असल्याची राजकीय वर्तुळात सुरु आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात मनसेलाही संधी मिळणार अशी चर्चा रंगतेय. तर दुसरीकडे विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली जातेय. या प्रकरणात आता मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. राजू पाटील यांनी एक ट्विट करत थेट मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे मनसे आणि शिंदे सरकारमध्ये काही तरी बिघडल्याची चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. बंड झाले,आता थंड झाले ? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. अशा शब्दात राजू पाटील यांनी लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली आहे. तसंच तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ? असा सवालही राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीत मनसेने शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली होती. या भेटीनंतर मनसेला मंत्रिपद किंवा राज्यमंत्रिपद मिळण्याची चर्चा रंगत होती. पण मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने आता मनसे आणि शिंदे सरकारमधील राजकीय संबंध बिघडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


हेही वाचा : नायडूंनी सर्व भूमिका चोख बजावल्या, त्यांच्यासोबत कामाची संधी मिळाली हे माझे सौभाग्य ; पंतप्रधान मोदींकडून कौतुक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -