राज्यसभेच्या निवडणुकीत मनसेचे मत कोणाला?, आमदार राजू पाटील म्हणतात…

राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणुकीचे मतदान (Election) सहा जागांसाठी होणार असून, सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

MNS MLA Raju Patil Slams Shivsena
'अशी कशी फुटून गेली वाघाची छाती' राजू पाटलांचा शिवसेनेला टोला

राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणुकीचे मतदान (Election) सहा जागांसाठी होणार असून, सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांशी चर्चा करून आपल्यासोबत राहण्याची विनंती महाविकास आघाडी (MVA) आणि भारतीय जनता पक्षाकडून केली जात आहे. परंतु, सध्या चर्चेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) एकमेव कल्याण-डोंबिवलीचे आमदार राजू पाटील कोणाला मतदान करणार?, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आता या चर्चांना आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पूर्णविराम दिला आहे.

मागील काही दिवसांपासून मनसे आमदार राजू पाटील हे नॉट रिचेबल होते. मात्र आता राजू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले मत स्पष्ट केले आहे. “माझी तब्येत ठीक नसल्याने आराम करत होतो. तसेच, शनिवारी प्रशासकीयही काही काम नव्हती. त्यामुळे घरीच होतो. नॉट रीचेबल असणे किंवा मला कोठे घेऊन जाणे हे माझ्या बाबतीत होणार नाही. मनसेची भूमिका तटस्थ असून, जेव्हा फ्लोर टेस्टिंग झाली तेव्हा आम्ही तटस्थ राहिलो”, असे राजू पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा – भाजपची ब्लू प्रिंट तयार, संजय पवार यांचा पराभव होणार, आशिष शेलारांचा इशारा

आम्ही मतदान करू किंवा तटस्थ राहू

“आता मागच्या वेळेस छत्रपती संभाजीराजेंचा फोन आणि मेले आलेला त्यावेळेस राज साहेबांचा आदेश घेऊन त्यांच्या नॉमिनेशन फॉर्मवर सही पण केली होती. परंतु, ह्या क्षणाला तरी मला राज साहेबांकडून (Raj Thackeray) काही आदेश आला नाहीये त्यामुळे ते जसे सांगतील त्याप्रमाणे पुढे वाटचाल असेल. मतदान करायचे, कोणाला करायचे की तटस्थ रहायचे हा सर्वस्वी पक्षाचा विषय आहे. त्यामुळे राज साहेब सांगतील, त्याप्रमाणे आम्ही मतदान करू किंवा तटस्थ राहू”, असेही मत त्यांनी मांडले.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडून अपक्षांच्या मनधारणीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार असल्याने निवडणूक लागली आहे. भाजपाने राज्यसभेसाठी ३ उमेदवार दिले आहेत, त्यामध्ये पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. तसेच, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांच्यापैकी सहा उमदेवार खासदार होतील, तर एका उमेदवाराचा पराभव होणार आहे.


हेही वाचा – नुपूर शर्माच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर कतार, कुवैत, इराणची नाराजी, भारतानं केला खुलासा