Maharashtra Band : कृषी विधेयक संमत होताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून का बसले ? मनसेचा सवाल

महाराष्ट्राने उत्तर प्रदेशच्या पाठीशी का उभ रहायच ? मनसे

MNS New Flag

उत्तर प्रदेशाथील लखीमपुर खेरी येथे शेतकऱ्यांसोबत झालेली हिंसाचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेचा निषेध व्हायला हवा. जेव्हा संसदेत कृषी कायद्याचे विधेयक संमत होत होते, तेव्हा महाविकास आघाडीचे खासदार का शेपूट घालून बसले होते ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. शिवसेनेच्या खासदारांनी त्याठिकाणी आवाज का उठवला नाही ? लोकसभेत का पाठिंबा दिला ? महाराष्ट्राचे सन्माननीय नेते संदीप देशपांडे का अनुपस्थित होते ? याची उत्तरे महाविकास आघाडीला द्यावीच लागतील अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात मावळमध्ये जेव्हा शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता, तेव्हा उत्तर प्रदेशात बंद करण्यात आला होता का ? असाही सवाल मनसेने केला आहे.

लॉकडाऊनमुळे जनतेची कंबरमोड

 

आज उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या लखीमपुर खेरी हिंसाचाराविरोधात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पण लॉकडाऊनमध्ये लोकांची पुर्णपणे कंबरमोड झालेली आहे. आर्थिक नुकसान झालेले आहे. सणासुदीच्या काळात व्यापारधंदा होणे अपेक्षित असताना, तुम्ही फक्त तुमच राजकारण म्हणून बंद करण्याचे आवाहन करत आहात. मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीला जाता तेव्हा मोदींसोबत गुलूगुलू बोलतात. त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने फटका सहन करायचा. ही कोणती मानसिकता आहे, असा सवाल मनसेने केला आहे. आमचा महाविकास आघाडीला प्रश्न आहे की, तुम्ही युती आजी माजी सगळ व्यवस्थित सुरू आहे. पण राजकारण करत जनतेला वेठीस का धरता ? असाही सवाल केला आहे. आज जनतेचे आर्थिक होते, ते कुणी भरून द्यायचे ? असाही सवाल मनसेने केला आहे. स्वतः पोलिसही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असल्यासारखे सगळीकडे बंद करत फिरत आहेत. ज्या पोलिसांनी लोकांना सुरक्षा दिली पाहिजे, त्यांनी बंद करायला कसाकाय पुढाकार घेतात असाही सवाल त्यांनी केला.

तेव्हा उत्तर प्रदेशात बंद पाळला गेला ? 

महाराष्ट्रात जेव्हा मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला, तेव्हा उत्तर प्रदेशात बंद पाळला गेला का ? असाही सवाल संदीप देशपांडे यांनी केला. उत्तर प्रदेशातील बसपा, समाजवादी पार्टी उभ राहत नाही, मग महाराष्ट्राने उत्तर प्रदेशच्या पाठीशी का उभे रहायचे असेही ते म्हणाले. घटनेचा निषेधच करायचा असेल तर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा, संसदेत आवाज उठवा, संसद चालू देऊ नका. संसदेत तुम्ही तुमची काम करून घेणार, तिकडे विरोध करणार नाही.


Maharashtra band: मुंबई पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा, दुकाने ४ वाजेपर्यंत बंद राहणार