घरमहाराष्ट्रमनसेमधील पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर; रायगडमधील खंदा पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर

मनसेमधील पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर; रायगडमधील खंदा पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर

Subscribe

रायगड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील मनसेचे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील हे शेकडो पदाधिकारी/कार्यकर्त्यांसह लवकरच (शिवसेना-शिंदे गट) या पक्षात सामील होणार आहेत. रुपेश पाटील गेल्या १५ वर्षांपासून मनसे पक्षामध्ये सक्रिय आहेत आणि मध्य रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी अनेक महत्त्वपूर्ण काम रुपेश पाटील यांच्यामार्फत करण्यात आलेले आहेत. पक्षाची ध्येय धोरण संपूर्ण माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे रुपेश पाटील या तरुण मनसैनिकाने केलेलं आहे; पण हाच तरुण रुपेश पाटील आता शिंदे गटाच्या वाटेवरती आहे.

याला मुख्य कारण म्हणजे रायगड-मध्य मधील पक्षांतर्गत गटबाजी. गेल्या काही वर्षांपासून आपण पाहत आहे की मनसे मधील पक्षांतर्गत गटबाजी ही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक आमदार,नगरसेवक आणि महत्वाचे पदाधिकारी हे पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात जात आहे. याच कारणामुळे रुपेश पाटील हे देखील लवकरच पक्ष बदलणार असल्याची माहिती आहे

- Advertisement -

आगरी समाजातून येणाऱ्या रुपेश पाटील यांचा जनसंपर्क मध्य-रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या या पक्ष बदलीमुळे मनसे पक्षातील अंतर्गत वाद हे पुन्हा चव्हाट्यावर येतील. अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा झाला या वाढदिवसानिमित्त रुपेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिलेल्या होत्या.


ठाकरेंचं धनुष्यबाण आता शिंदे गटाच्या प्रोफाईलवर; या नेत्यांनी बदलले फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -