आता कसं वाटतंय? मनसेचा शिवसेनेला खोचक सवाल

MNS-Poster

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (Maharashtra Navnirman Sena) आता उडी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पोस्टर लावून शिवसेनेची खरडपट्टी काढली आहे. त्यात शिवसेनेकडे बोट दाखवत आता कसं वाटतंय, असा सवाल केला आहे. मनसेचे हे पोस्टर मुंबईतील साकीनाका परिसरात लावण्यात आले आहे. अजान वादातही राज ठाकरे उघडपणे उद्धव ठाकरे सरकारसमोर उभे ठाकले होते. त्यांनी सर्व मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. (How do you feel now, mns asking Shivsena by banner)

हेही वाचा संकटाच्या काळात कोणीही विचारपूस केली नाही, यामिनी जाधवांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

एक काळ असा होता की राज ठाकरेंकडे शिवसेनेचे भावी नेते म्हणून पाहिले जायचे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक चमकता तारा होते. लोकांमध्ये बाळ ठाकरेंची प्रतिमा दिसायची. त्यामुळे ते शिवसैनिकांच्या पसंतीस उतरले. मात्र, शिवसेनेला उत्तराधिकारी बनवताना बाळ ठाकरे यांनी पुतण्या राज यांच्याऐवजी पुत्र उद्धव यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. त्यावरून राज ठाकरे नाराज झाले. त्यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले. जानेवारी 2006 मध्ये पक्षापासून फारकत घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मार्च 2006 मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी या पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) असे नाव दिले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक शिवसेना समर्थकही गेले होते.

आणखी वाचा 

शिवसेनेतील बंडखोरीमुळे आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. यावेळी बंडखोरी कोणी केली नसून बाहेरच्यांनी केली आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्या पायाखालची जमीनच सरकवली आहे.

हेही वाचा – नरहरी झिरवाळांविरोधात अविश्वास प्रस्ताव,अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा अपक्ष आमदारांचा दावा

शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते. तर, आता सेनेचे ४२ आमदार फुटले आहेत. त्यामुळे आता  कसं वाटतंय, असा कुस्सित सवाल मनसेने पोस्टरद्वारे विचारला आहे.