घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? राज ठाकरेंनी दिलं भन्नाट उत्तर

उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? राज ठाकरेंनी दिलं भन्नाट उत्तर

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६१ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? या प्रश्नावर भन्नाट आणि रोखठोक उत्तर दिलं आहे. राज ठाकरे हे आज ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या का? असा सवाल करण्यात आला. त्यावर उत्तर देताना “मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, तु काळजी नको करु,” असं रोखठोक उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. यावेळी त्यांनी ठाणे दौऱ्यामागील कारण सांगितलं. संघटनांच्या बांधणीसंदर्भात काही सूचना केल्या. १५-२० दिवसांनी मी पुन्हा एकदा येईन आणि त्यांच्याशी बोलेन, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

- Advertisement -

मदतकार्य महत्त्वाचं, पाहण्यात काही अर्थ नाही

राज्यातील पूरग्रस्तांना प्रत्येकजण मदत करण्याचं काम करत आहे. मी महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केल्यानंतर माझा महाराष्ट्र सैनिक पूरग्रस्त भागात पोहोचला आणि मदतकार्य सुरु आहे. आताच्या घडीला मदतकार्य महत्त्वाचं, पाहण्यात काही अर्थ नाही आहे. जेवढी मदत पोहचेल तेवढं चांगलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

कोणत्याही गोष्टीचं नियोजन नाही

पूर परिस्थइती निर्माण होण्यामागे योग्य नियोजन नाही. कोणत्याही गोष्टीचं नियोजन नाही. दोन वर्षांपूर्वी पण असंच झालं होतं. याचं कारण म्हणजे नुसत्या वस्त्या वाढत आहेत. त्याला आकार उकार नाही आहे. त्याला आकार उकार द्यावा असं कुठच्याही सरकारला वाटत नाही. ठाणे शहराची परिस्थिती पाहिली तर वाईट अवस्था आहे. कोणत्याही शहराकडे लक्ष दिलं जात नाही आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -