घरताज्या घडामोडीमनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण, पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलली

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण, पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलली

Subscribe

राज ठाकरेंच्या शरीरामध्ये कोविड डेड सेल्स आढळले आहेत. यामुळे त्यांना शस्त्रक्रियेपूर्वी भूल देता येणार नाही. असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पायावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल आला आहे. राज ठाकरे सध्या लिलावती रुग्णालयातून घरी परतले आहेत. १ जून रोजी राज ठाकरेंच्या पायावर शस्त्रक्रिया होणार होती परंतु त्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे मागील काहि दिवसांपासून पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत. अनेक बैठका त्यांनी घेतल्या आहेत. तसेच राज ठाकरे यांनी सभासुद्धा घेतल्या होत्या. या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असावी असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचणी अहवाल काढण्यात आले. यावेळी कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे त्यांना घरी राहून कोरोनावर उपचार घेता येईल. परंतु शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली असून कोरोनातून बरे झाल्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येईल.

राज ठाकरेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाली होती. सौम्य लक्षण आढळल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली होती. यामध्ये त्यांच्या बहिणीला आणि आईलासुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

कोविड डेड सेल्स आढळल्याने शस्त्रक्रिया रद्द 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. राज ठाकरेंची रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली. चाचणी अहवालात राज ठाकरेंच्या शरीरामध्ये कोविड डेड सेल्स आढळले आहेत. यामुळे त्यांना शस्त्रक्रियेपूर्वी भूल देता येणार नाही. असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. वैद्यकीय कारणास्तव राज ठाकरेंच्या पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -