मनसेचा पुण्यात जाहीर मेळावा, राज ठाकरेंची तोफ धडाडणार?

MNS Raj Thackeray arrange public meeting in Pune to decide Strategy

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. सर्वांच्या आगोदर मनसेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे, ठाणे, मुंबईमध्ये सभा घेतली होती. आता पुन्हा पुण्यात मनसेचा जाहीर मेळावा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे मनसेमध्ये खांदेपालट केल्यानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसेची पुढील रणनिती ठरण्याची शक्यता आहे. परंतु यावेळी पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकांसाठी तयारी केली आहे. तसेच मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली आहे. पुण्यात आता जाहीर मेळावा होणार आहे. १५ मे रोजी रविवारी हा मेळावा होणार आहे. मनसेमध्ये सुरु असलेल्या वादात आता पक्षातून कोणती भूमिका घेण्यात येईल याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता मनसैनिकांप्रमाणे महाराष्ट्राला लागली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी तयारी सुरु केली आहे. पुण्यात राज ठाकरेंनी यापूर्वी अनेकवेळा दौरा केला आहे. गेल्याच आठवड्यात राज ठाकरेंनी दौरा केला होता. पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांना केल्यानंतर राज ठाकरेंचा हा पहिला दौरा होता. वसंत मोरे यांना पुणे शहर अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे. तसेच मनसेच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे पुण्यात नाराजी आहे. यामुळे आताच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या मेळाव्याला मनसे नेते बाळा नांदगावकरसुद्धा उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा : मुंब्र्यातील 6 कोटींच्या घबाड प्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह सात पोलीस निलंबित