घरट्रेंडिंगराज ठाकरेंना न्यायालयाचा दिलासा; 'त्या' प्रकरणी अटक वॉरंट रद्द

राज ठाकरेंना न्यायालयाचा दिलासा; ‘त्या’ प्रकरणी अटक वॉरंट रद्द

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सांगलीच्या इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र (islampur session court) न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सांगलीच्या इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र (islampur session court) न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द केले आहे. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली. याप्रकरणी ज्यावेळी न्यायालय निर्देश देईल त्यावेळी त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावे लागेल, असे सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले. (raj thackeray arrest warrant canceled by islampur court)

राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाची २००६ साली स्थापना झाली. मनसेच्या स्थापनेनंतर त्यांच्या खळखट्याक भूमिकेमुळे राज ठाकरे नेहमीच चर्चेत राहिले. त्यानंतर याच खळखट्याक भुमिकेमुळे राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेक केस दाखल करण्यात आल्या होत्या. शिवाय, काही वर्षांपूर्वी रेल्वे भरती (Railway Bharti) परीक्षेच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भुमिका घेत उत्तर भारतीयांविरोधात एल्गार पुकारला होता.

- Advertisement -

हेही वाचा – मनसेकडून रत्नागिरी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

याप्रकरणी रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होते. त्यामुळे मनसेने आंदोलन करून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी सांगलीच्या शिराळा मध्ये मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून राज ठाकरे, तानाजी सावंत आणि काही जाणांवर हे गुन्हे दाखल झाले होते.

- Advertisement -

‘मनविसे’च्या पुनर्बांधणीला सुरूवात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्यावर पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अमित ठाकरेंनी कामाला सुरूवात केली आहे. त्यानुसार, अमित ठाकरे यांनी पहिल्याच टप्प्यात विद्यार्थी सेनेचे ७ विभाग अध्यक्ष बदलले. तसेच, निवडक ठिकाणी विभाग अध्यक्षांची फेरनिवड केली आहे.


हेही वाचा – बाजीगरचा निर्माता शिवसेनेचे संजय राऊत; आशिष शेलारांचा थोरातांच्या ‘त्या’ विधानावर पलटवार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -