राज ठाकरे २ दिवसीय पुणे दौऱ्यासाठी रवाना, वसंत मोरेंची भेट घेणार?

MNS president Raj Thackeray's corona infection surgery postponed
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण, पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या दिशेना राज ठाकरे रवाना झाले आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे चर्चा करतील. यादरम्यान माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांची भेट घेणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. वसंत मोरे यांना निवांत वेळ देणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं होते. यापूर्वी राज ठाकरेंनी पुणे दौरा केला होता. पुण्यात महाआरती आणि हनुमान चालिसा पठणात त्यांनी सहभाग घेतला होता. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील अशी शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावरुन पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. पुण्यात यापूर्वी त्यांनी अनेकवेळा दौरा केला आहे. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे. दरम्यान अयोध्या दौरा हा पुढील महिन्यात होणार आहे. या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या नाव नोंदणीच्या मोहिमेचे उद्घाटन राज ठाकरे करणार आहेत.

पुण्यातील मनसैनिकांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे चर्चा करतील. तसेच अयोध्या दौऱ्यापूर्वी पुन्हा एकदा राज ठाकरेंची सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.

वसंत मोरेंची भेट घेणार?

नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट घेणार असल्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेवर वसंत मोरेंनी नाराजी वर्तवली होती. वसंत मोरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. मागील पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी वसंत मोरेंना भेट दिली नव्हती. परंतु निवांत वेळ देतो असे राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये वसंत मोरे आणि राज ठाकरे यांच्यात भेट होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन हटवलं आहे. साईनाथ बाबर यांना पुण्याचे मनसे शहराध्यक्ष करण्यात आले आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की रश्मी ठाकरे खरे कोण?, कोर्लईतील १९ बंगल्यांवरुन सोमय्यांचा पुन्हा घणाघात