कोणाला किती पैशांच्या ऑफर गेल्या हे ठाऊक आहे; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य

mns raj thackeray

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करत गेलेल्या आमदारांनी 50 खोके घेतल्याचे आरोप ठाकरे गटासह सर्वच विरोधी पक्ष करत आहेत. यावरून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि विरोधकांकडून आरोप- प्रत्यारोपही झाले. अद्यापही या 50 खोक्यांच्या आरोपावरून राजकारण रंगताना दिसते. अशात खोक्यांच्या आरोपांत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक मोठं विधान केलं आहे.

पैशांची आमिष दाखवली जात आहेत. मला माहिती आहे, कोणा कोणाला किती पैशांच्या ऑफर गेल्या. असं खळबळजनक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणातील खोक्यांचे आरोप खरे आहेत की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरे कोकण दौऱ्यावरून असून आज त्यांनी राजापूर तालुक्याला भेट दिली. यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते राजापूर तालुक्यातील कार्यालयाचं उद्धाटन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे, परंतु महाराष्ट्र सैनिक फुटत नाही, त्याबद्दल त्यांचा अभिमान आहे. पैशांची आमिष दाखवली जात आहे. कोणा कोणाला किती पैशांच्या ऑफर गेल्या मला माहिती आहे. पण कडवट, निष्ठावान असणं या गोष्टींच यशात रुपांत होईल याबाबत निश्चिंत रहा.

येणाऱ्या मुंबई महापालिका, ठाणे असेल गेल्या दोन अडीच वर्षात निवडणुकांची पाईपलाईन तुंबली आहे. ती पुढच्या फेब्रुवारी, मार्चमध्य़े मोकळी होईल. पण पुन्हा जानेवारीत कोकणात येणार आहे आणि ज्या काही सुचना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी झाली की नाही हे पाहणार आहे. त्यावेळी पुन्हा आपले दर्शन होईल, मला जे काही तुमच्यासमोर मांडायचं आहे, कोकणासंदर्भात, महाराष्ट्र संदर्भात, मराठी माणसासंदर्भात, हिंदुत्वासंदर्भात ते सगळे विचार त्यावेळी निश्चित मांडेन. असही राज ठाकरे म्हणाले.


राज्यपालांविरोधात पुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात; उदयनराजेंची घोषणा