राज ठाकरे यांचं विद्युत नियामक आयोगाला पत्र

mns raj thackeray sent a letter to the electricity regulatory commission
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवलं आहे. या पत्रात बेस्ट वीज विभागाचा नफा परिवहनला का देता? असा प्रश्न विचारला आहे. तसंच परिवहन विभागाबाबत सरकार उदासिन असल्याची टिपणी देखील या पत्रात केली गेली आहे. बेस्ट परिवहनचा तोटा पालिकेने भरावा नफा परिवहनला देऊ नये असे आदेश देण्याची मागणी या पत्रातून राज ठाकरे यांनी केली आहे. बेस्ट उपक्रम गेले कित्येक वर्षे विद्युत पुरवठा विभागास होणार भरघोस नफा हा कायमस्वरुपी तोट्यात असणाऱ्या परिवहन विभागाकडे वळत करीत आहे. हे विद्युत कायदा २००३ चे बेस्टकडून उल्लंघन झाल्याचं या पत्रात म्हटलं आहे. तसंच बेस्टच्या वीजदरवाढीवर फेरविचार करण्यात यावा अशी सूचना या पत्रातून राज ठाकरे यांनी दिली आहे.

विद्युत विभाग हा बेस्टच्या परिवहन विभागाच्या तुलनेत नफ्यामध्ये आहे. विद्युत विभागाचा नफा हा परिवहनचा तोटा भरून काढण्यासाठी तिथे वळवला जातो. त्यामुळे बेस्टने आता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. यावर मनसेने आक्षेप नोंदवला आहे. बेस्टचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे असला तरी त्यासंबंधी अजून निर्णय झालेला नाही.


हेही वाचा – मुंबई महापालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक असलेले उपायुक्त पवार यांची बदली