Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : कोणती तरी नस मोदी सरकारने दाबली असावी, वडेट्टीवार थेटच बोलले

Raj Thackeray : कोणती तरी नस मोदी सरकारने दाबली असावी, वडेट्टीवार थेटच बोलले

Subscribe

मुंबई : कणखर नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल, मंगळवारी जाहीर केले. यावरून आता महाविकास आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणती तरी नस मोदी सरकारने दाबली असावी, अशी खोचक प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. (MNS : Raj Thackeray speech gudi padwa 2024 reactions in marathi)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा काल, मंगळवारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. अपेक्षेप्रमाणे महायुतीत सहभागी होत असल्याचे राज ठाकरे यांनी या मेळाव्यात जाहीर केले. या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी या मेळ्याव्यात मांडली.

यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी ते भाजपाबरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते. वाघाची शेळी झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : सगळ्या असंतुष्टांचे…, मराठी चित्रपटाचा संदर्भ देत आव्हाडांकडून राज ठाकरे लक्ष्य

राज ठाकरे या लढवय्या नेत्याने भाजपाच्या गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले? असा सवाल करत विजय वडेट्टीवार म्हणाले, राज ठाकरे यांच्या सभेने विरोधकांचे धाबे दणाणले जात होते. पण आता यापुढे त्यांच्या सभेत केवळ मोदी यांचे गुणगान असेल तर, त्या सभेत काहीही राम नसेल. जनतेचा पाठिंबा त्याला नसेल. 2019मध्ये त्यांनी मोदी यांना लक्ष्य केले होते, पण या पाच वर्षांत असे नमके काय घडले की, त्यानी भूमिका बदलली. कदाचित त्यांची दुखती नस मोदी सरकारने दाबली असावी. काही ना काही तरी ‘दाल में काला है…’ आधी थोडेसे झुकले होते आता कमरेतून झुकले आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही.

हेही वाचा – MNS : भाजपाला पाठिंबा देताच राज ठाकरेंना धक्का; पदाधिकाऱ्याचा राजीनामा