घरमहाराष्ट्रमनसैनिकांनो राहिले फक्त 3 महिने, जोरदार काम...; राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र

मनसैनिकांनो राहिले फक्त 3 महिने, जोरदार काम…; राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या चार महिन्यापासून आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरून राज ठाकरे सरकारवर ताशेरे ओढत भाजपच्या बाजूने काहीशी मवाळ भूमिका घेताना दिसत आहेत. यात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले, आणि शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. यादरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी आजारावर मात करत पुन्हा पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच भाग म्हणून राज ठाकरेंनी आता मिशन विदर्भ हाती घेतले आहे. राज ठाकरे आजपासून पुढील पाच दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज सकाळी राज ठाकरे यांच नागपूरमध्ये आगमन झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड उत्साहात स्वागत केले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर रेल्वे स्टेशनला शेकडो पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती, ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले.

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे 2019 नंतर नागपूरात दाखल झाले आहेत. मुंबईहून ते काल विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरला निघाले. त्यानंतर आज सकाळी साडे आठच्या सुमारास ते नागपूर विमानतळावर पोहचले. यावेळी कार्यकर्त्यांच्या प्रंचड गर्दीतून सर्वांचे स्वागत स्वीकारात राज ठाकरे स्टेशनहून थेट हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी चहापान आवरून त्यांनी विदर्भातील पहिल्या बैठकीचा नारळ फोडला. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

- Advertisement -

आपल्याजवळ तीन महिन्यांचा कालावधी आहे, कामात मागे पडू नका, जोरदार काम करा, अशा सूचना त्यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याजवळ जे काही दिवस शिल्लक आहेत, त्या दिवसांत प्रचंड काम करा. घरघरात पोहचा. पक्षाची ध्येयधोरणे लोकांमध्ये पोहोचवा. आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल, असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

राज ठाकरे आजपासून पुढील 5 दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. आ राज ठाकरे सकाळी 11 वाजता रवी भवन सर्किट हाऊसवर संघटनात्मक बैठक घेणार आहे. यानंतर 19 सप्टेंबर रोजी ते मनसे नेत्यांच्या गाठीभेटी घेत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याच दिवशी ते चंद्रपूरात विभागवार बैठक घेतील, 20 ते 21 सप्टेंबर रोजी अमरावतीत विभागवार बैठक घेतील.


वाँटेड माओवादीला नालासोपाऱ्यातून अटक; महाराष्ट्र एटीएसची पहाटे कारवाई

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -