…तर क्षणभरात पक्षातून होईल हकालपट्टी; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी

mns Raj Thackerays

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सभा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरु केला आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनावेळी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांन पक्षातून हकालपट्टी करण्याची धमकी दिली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर मागील काही दिवसांपासून उलट सुलट चर्चा रंगत आहेत. अनेक राजकीय नेत्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणापूर्वी राज ठाकरेंनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोशल मीडियासंदर्भात एक मुद्दा उपस्थित केला होता. याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.

कार्यकर्त्यांना तंबी देत राज ठाकरे म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारण सुरु आहे.
जनतेने जागं होण्याची गरज आहे. लोकांमध्ये पसरवलं जाणारं विष बोलून छाटणं गरजेचं आहे. पक्षातील प्रमुख पदावरील पदाधिकाऱ्यांनी प्रमुख पदाची शान राखली पाहिजे. ज्या पदावर पक्षाने तुमची नेमणूक केली त्या पदाचा आदर केला पाहिजे. सोबतच्या सहकाऱ्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे. पण तुम्हीपण त्यांच्यातील होऊन वाद घालत बसणार असल तर कसं होईल. इतर पक्षांमध्ये जी धुडगूस चालू आहे ती चालू दे, पण ती माझ्या पक्षात चालणार नाही, बाळा नंदगावकरांच भाषण ऐकताना एक विषय काढला सोशल मीडियाचा, मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. जर समजा पक्षातल्या पक्षात अंतर्गत एकमेकांविषयी जर कोणी फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती कोणत्याही प्रकारच्या कॉमेंट केल्या तर त्याला एक क्षण भऱही परत पक्षात ठेवणार नाही हे लक्षात ठेवावं.

तुमचे चोचले आत्तापर्यंत खुप पुरवले. झालं तेवढ खुप झालं. तुम्हाला तुमचं काम सांगायच असेल तर माध्यमांचा उपयोग करा. पण जर सोशल मीडियावर सोशल मीडियावर एकमेकांविरोधात बोलं असेल तर ते माझ्यापर्यंत पोहच पाहिजे. माझ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सतर्क असणं गरजेचं आहे. मुलाखती, भाषणातून, पत्रकार परिषदेतून काय बोलतो याचे मुद्दे काढले पाहिजे. आंदोलन केले, राज ठाकरे बोलले, आंदोलन उभ राहिलं आंदोलन संपल .. झालं सगळं विसरले. रोजच्या कामाला लागले, असं जर होणार असेल तर परत, परत, परत, परत, असं किती वेळा करायचं, किती वेळा सांगायचं? असा सवालही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केला आहे.


… तर ओवैसींना माफी मागायला का सांगत नाही? नुपूर शर्मा प्रकरणावरून राज ठाकरेंचा ओवैसी बंधुंवर हल्लाबोल