घरमहाराष्ट्रMNS-BJP : मनसेने भाजपाचे प्रस्ताव नाकारले, युतीमध्ये सहभागी होण्याची चर्चा फिस्कटली?

MNS-BJP : मनसेने भाजपाचे प्रस्ताव नाकारले, युतीमध्ये सहभागी होण्याची चर्चा फिस्कटली?

Subscribe

मनसे महायुतीत येणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतु, महायुतीची ही चर्चा फिस्कटली असून सध्या तरी मनसे युतीत सहभागी होणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता मनसेही भाजपासोबत हातमिळवणी करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. लोकसभेत भाजपासोबत निवडणूक लढवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली गाठत भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ज्यामुळे मनसे महायुतीत येणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतु, महायुतीची ही चर्चा फिस्कटली असून सध्या तरी मनसे युतीत सहभागी होणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (MNS rejects BJP proposal, talks of joining Mahayuti stalled)

हेही वाचा… Mahayuti Politics : भाजपाचे राजकारण भविष्यासाठी घातक, मुख्यमंत्री शिंदेंच्या नेत्याने व्यक्त केली भीती

- Advertisement -

मनसेने महायुतीत सहभागी होऊन निवडणूक लढवावी, यासाठी जोरदार चर्चा दोन्ही पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत होती. त्यादृष्टीने हालचालीही सुरू झाल्या होत्या. परंतु मनसेने महायुतीतील एका चिन्हावर लढावे असा प्रस्ताव देण्यात आला. ज्यानंतर हा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळला. त्यानंतर मनसेने लोकसभा निवडणूक न लढता महायुतीला पाठिंबा द्यावा. त्या बदल्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागा घ्याव्यात असा आणखी एक प्रस्ताव देण्यात आला. मात्र राज ठाकरेंनी हाही प्रस्ताव नाकारला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे आता मनसेसोबत चर्चा सुरू होत्या परंतु वाटाघाटी होत नसल्याने सध्या तरी कुठलाही निर्णय नाही अशी स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, मनसेने भाजपा किंवा शिवसेनेच्या चिन्हावर लढावे असा प्रस्ताव महायुतीतील नेत्यांकडून ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाला मनसेने नकार दिला आणि मनसे स्वत:च्या रेल्वे इंजिन या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात आले. यानंतर राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीसांमध्ये भेटी झाल्या. त्यानंतर राज ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत मनसेला त्यांच्या चिन्हावर लढण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. मनसेने तीन जागांची मागणी केली. चर्चेत दोन जागांवर बोलणी झाली. त्यातील एका जागेवर दोन्ही पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र मनसेने आपल्याच चिन्हावर लढावे अशी अट पुन्हा पुढे करण्यात आली आणि ज्यामुळे महायुतीतील समावेशबाबतची चर्चा फिस्कटली अशी माहिती समोर आली.

- Advertisement -

ज्यामुळे आता मनसेने महायुतीकडून दिलेले सर्व प्रस्ताव फेटाळल्याने लोकसभा निवडणुकीबाबतची कोणतीही चर्चा होऊ शकलेली नाही. तर मनसेकडून देखील याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबईतील दक्षिण मुंबई ही जागा मनसेला महायुतीत मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. याठिकाणी सध्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच महाविकास आघाडीने रिंगणात उतरवले आहे. तर या मतदारसंघात मनसेची ताकद पाहता ही जागा मनसेला देण्यासाठी महायुती सकारात्मक आहे, असे चित्र अद्यापही आहे. परंतु. मनसेने युतीचा प्रस्ताव फेटाळल्याने आगामी काळात मनसे-भाजपा युतीवर नेमका कोणता तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -