घरताज्या घडामोडीशिवसेना नगरसेविका अश्विनी माटेकरांनी संस्थांद्वारे घोटाळा केला, मनसेचा आरोप

शिवसेना नगरसेविका अश्विनी माटेकरांनी संस्थांद्वारे घोटाळा केला, मनसेचा आरोप

Subscribe

शिवसेना नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी वॉर्ड क्रमांक १५६ मध्ये महिला बचत गट आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून लाखो रुपयांची वसुली केली असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. संघर्ष महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा मीना फडतरे यांच्याकडून नगरसेविका माटेकर यांनी महिन्याला ८९ हजार रुपयांचा चेक घेतला आहे. तसेच संघर्ष महिला विकास संस्थाही त्यांनी हडप केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मीन फडतरे यांनी आपण स्वतः दरमहिन्याला चेक दिले असल्याचे सांगितले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी माटेकर यांच्या भ्रष्टाचाराचा खुलासा केला आहे. देशपांडे म्हणाले की, भ्रष्टाचार करणारे नगरसेवक वेगळेच आणि भ्रष्टाचाराचे पैसे चेकमध्ये घेणारे नगरसेवक वेगळेच, मीना सुभाष फडतरे या संघर्ष महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा आहेत. मुंबई महानगरपालिकेची गेल्या अनेक वर्षांपासून दत्तक वस्ती योजना चालू होती झोपडपट्ट्यांतील साफसफाईचे काम या योजनेतून सुरु होते. कालांतराने या योजनेचे नाव बदलून स्वच्छ मुंबई अभियान करण्यात आले. स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावने ही योजना शिवसेनेने सुरु केली. यामध्ये अनेक संस्थांना घेण्यात आले. पहिले नगरसेवकांच्या सांगण्यानुसार संस्थेला दत्तक वस्ती योजनेचे काम दिले जात होते परंतु नंतर लॉटरी सिस्टम काढण्यात आली.

- Advertisement -

धमकावून चेक आपल्या नावे घेतले

लॉटरी सिस्टमद्वारे ज्या संस्था आहेत. महिला बचतगट, बेरोजगारांच्या संस्था, एनजीओ यांना काम देण्यात येते होते. तसेच संघर्ष महिला विकास संस्थेला वॉर्ड क्रमांक १५६ इथे काम मिळाले काम मिळाल्यानंतर तिथल्या नगरसेविका त्यांचे पती यांना वारंवार बोलवायला लागले कार्यालयात उपस्थित राहायला सांगितले. त्यांना सांगितले की, महानगरपालिकेकडून येणारे पेमेंट दर महिन्याला येते त्यातून ६० ते ९० टक्के हिस्सा आम्हाला पाहिजे तुम्हाला कुठलेही नाहीतर काम करायला देणार नाही. वॉर्ड ऑफिसरला सांगून तुमची संस्था काळ्या यादीत टाकू असे अनेक खेळ करण्यात आले. मुद्दाम कचरा टाकून कारवाई करण्यात आली. शेवटी घाबरुन एक ऑफर देण्यात आली की, तुमच्या पेमेंटमधून ९० टक्के रक्कम आम्हाला आली पाहिजे. यानंतर जबरदस्तीने चेकवर स्वतःच्या भावाच्या आणि नगरसेविकेच्या दीराच्या नावाने चेक बनवण्यात आले असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

नगरसेविका अश्विनी माटेकर त्यांचे दीर आहेत संजय परशुराम माटेकर यांच्या नावावर जे चेक घेण्यात आले होते. त्या चेकची बँक स्टेटमेंट देखील देशपांडे यांनी माध्यमांसमोर दाखवली आहे. माटेकर यांच्याविरोधात मागील २० ऑक्टोबर २०२० मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. कोणतीही कारवाई झाली नाही. कारवाई करण्यासाठी वेगळा पुरुवा अजून काय पाहिजे हे कळत नाही. नगरसेवक अशा पद्धतीने लुबाडत असतील तर त्यांच्यावर काय कारवाई होणार हे मला कळत नाही. लोकांचे वाभाडे कारणारे महाविकास आघाडी सरकार स्वतः जर भ्रष्टाचारामध्ये लिप्त असेल नगरसेवक अशा प्रकारे खंडणी वसुल करत असतील तर या विरप्पन गँगचे करायचे काय? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. 

- Advertisement -

हेही वाचा : श्रीमंतांच्या पोरांना अडकवून खंडण्या उकळण्याचा नवा धंदा सुरु केलाय; शिवसेनेचा भाजपवर घणाघात

 


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -