घरमहाराष्ट्रपुण्यात मनसेच्या पाठिंब्यावर संजय राऊतांच्या प्रतिक्रियेवर मनसेचं ट्वीट; म्हणाले, "जाहिरातीच्या पैशांवर..."

पुण्यात मनसेच्या पाठिंब्यावर संजय राऊतांच्या प्रतिक्रियेवर मनसेचं ट्वीट; म्हणाले, “जाहिरातीच्या पैशांवर…”

Subscribe

राज ठाकरेंची मनसे आता भाजपला पाठिंबा देणार आहे. प्रत्यक्ष प्रचार न करता मनसे भाजपसोबत उभी राहणार आहे. यावरून आता शिवसेनेचा पारा चांगलाच चढलाय.यात आता शिवसेना-मनसेमध्ये चांगलाच वाद पेटलाय.

पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा दिलाय. या पाठिंब्यावरुन ठाकरे गट आणि मनसेमध्ये वाद सुरू झालाय. मनसेच्या पाठिंब्यावरुन पुण्याचं राजकारणही तापलंय. अशात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेच्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया दिली. त्यावरून मनसेनं एक ट्विट शेअर करत संजय राऊतांना चांगलाच टोला लगावला आहे. त्यामुळे पुण्यातल्या पोटनिवडणूकीवरून आता शिवसेना आणि मनसेमध्ये कलगीतुरा रंगलेला पहायला मिळतोय.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील आमदारांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजपसह महाविकास आघाडीत प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुकीत आता मनसेचीही एन्ट्री झालीय. काही दिवसांपूर्वी पोटनिवडणुका बिनविरोध करा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. मात्र तसं न झाल्यामुळे राज ठाकरेंची मनसे आता भाजपला पाठिंबा देणार आहे. प्रत्यक्ष प्रचार न करता मनसे भाजपसोबत उभी राहणार आहे. यावरून आता शिवसेनेचा पारा चांगलाच चढलाय.

- Advertisement -

मनसेचा भाजपाला पाठिंब्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “टेबला खालून जे व्हायचं ते आता टेबला वरून होतंय एवढंच…या युतीचा काहीही फरक महाविकास आघाडीला होईल असे वाटत नाही. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. संदीप देशपांडे यांनी सामना वृत्तपत्रात छापून आलेली एक जाहीरात शेअर करत ट्वीट केलंय. ही जाहीरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असून सामना वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर छापण्यात आली आहे. या जाहीरातीचा फोटो ट्वीट करत देशपांडे यांनी सरकारी जाहिरातीच्या पैशांवर चालणाऱ्या सामनामधून पगार घेणाऱ्यांची आमच्याबद्दल बोलायची लायकी नाही जाहिराती बंद तर पगार पण बंद “चड्डीत राहायचं “, असं ट्वीट केलं आहे.

- Advertisement -

मनसेचे साईनाथ बाबर प्रशांत जगतापांना उद्देशून म्हटले होते की लग्न लोकाचं अन् नाचतायत दुसरेच त्यावर आता साईनाथ बाबरांना जगतापांनी उत्तर दिलंय की बाळा शुद्धीवर ये…तुझ्या सायबानं सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर. कसबा पोटनिवडणुकीत मविआचे रवींद्र धंगेकरांना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मदत होणाराय. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या हेमंत रासनेंना मनसेचा पाठिंबा असेल तिकडे चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेकडून कुणीही इच्छूक नव्हतं. गेल्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेचा एकच नगरसेवक होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -