उत्तर प्रदेश जिंकणारच, झुकेगा नही, मनसेनं व्हिडीओ ट्विट करत केले शिवसेनेला ट्रोल

MNS sandeep deshpande tweet uttar pradesh shivsena activist mask use try video
उत्तर प्रदेश जिंकणारच, झुकेगा नही, मनसेचा शिवसेनेला तो व्हिडीओ ट्विट करत टोला

शिवसेनेचे नेते उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं आणि भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्याना शिवसेना खासदार धैर्यशील माने जेव्हा व्यासपीठावरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांच्याबाजूला असलेल्या कार्यकर्त्याचे मास्क घालण्यासाठीचे प्रयत्न तब्बल २ मिनिट सुरु होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी तो व्हिडीओ ट्विट करत झुकेंगा नही साला असा टोला लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक ७ टप्प्यात होत असून आतापर्यतं एकूण ४ टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. सातव्या टप्प्यात वाराणसी, गोरखपूरमध्ये मतदान होणार आहे. या ठिकाणी शिवेसनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेकडून जोरात तयारी करण्यात आली आहे. यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि धैर्यशील माने हे नेते उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. खासदार धैर्यशील माने यांच्या बाजूला असणाऱ्या एका कार्यकर्त्याचा व्हिडीओ ट्विट करत शिवसेना उत्तर प्रदेश जिंकणार झुकेगा नही साला असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

देशपाडेंनी शेअर केलेल्या व्हिडीओत काय?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असून यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते दिसत आहेत. व्यासपीठावर खासदार धैर्यशील माने उत्तर प्रदेशमधील जनतेला संबोधित करत आहेत. यामध्ये धैर्यशील माने संबोधित करताना त्यांच्या बाजूला काही कार्यकर्ते आहेत. यामधील एकाने मास्क घातला आहे तर दुसऱ्याच्या हातात मास्क असून तो मास्क घालण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीला कार्यकर्ता मास्क कानाला अडकवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला काही जमत नाही. साधारण व्हिडीओमध्ये कार्यकर्ता तब्बल २ मिनिट १२ सेकंद फक्त मास्क घालण्यासाठी घेत असल्याचे दिसत आहे. शेवटी कार्यकर्ता त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीला मास्क घालण्याबाबत विचारतो असे दिसत आहे. यानंतर तो बरोबर घालतो. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचा आता विरोधकांकडून वापर करण्यात येत असून मनसेनंही तोच व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : 12th Board Exam : बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, ५ आणि ७ मार्चचे पेपर पुढे ढकलले